गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या जिल्ह्यात ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र व २५ ग्रामीण रुग्णालयात यंत्र सामुग्रीसह व आठ नव्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण

by India Darpan
मार्च 3, 2024 | 4:17 pm
in संमिश्र वार्ता
0
unnamed 2024 03 03T161556.627

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रुग्ण सेवेत रुग्णवाहिकेचे अनन्य साधारण महत्व असून रुग्णवाहीकेमुळे रुग्णांना जलद गतीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे. शहरी व ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा, आवश्यक साधन सामग्री मिळवून दिली असून त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली नसून जिल्ह्यातील आरोग्यसेवेचा दर्जा सतत उंचावण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सजग राहावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्हा रुग्णालयाच्या अधिनस्त उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय अशा २५ रुग्णालयाचे व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त ७७ आरोग्य आरोग्य केंद्र असे मिळून 102 रुग्णालयामध्ये नवीन यंत्र सामुग्रीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी अल्पबचत भवन येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेतून 2023- 24 या आर्थिक वर्षात मंजुर करण्यात आलेल्या नाविण्य पुर्ण योजनेंतर्गत जिल्हा रुग्णालय जळगांव अधिनस्त उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय अशा 25 आरोग्य संस्था व जिल्हा आरोग्य अधिकारी जळगांव यांचे अधिनस्त 77 आरोग्य संस्थांमध्ये ऑपरेशन थिएटर, रक्त साठवण केंद्र व रुग्णालय बळकटीकरण करण्यासाठी आवश्यक 27 यंत्र खरेदी करण्यात आले आहेत. ते प्रत्येक यंत्राची पाहणी करून त्याची उपयोगिता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाणून घेतली. अगदी शेवटच्या घटकाला ज्या उपरुग्णालयातून, ग्रामीण रुग्णालयातून आरोग्य सुविधा मिळते तिथे साधनाची कमतरता पडू नये म्हणून हे बळकटीकरण केले असल्याचे सांगून गरजू रुग्णांना याचा फायदा होणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत नव्या आठ रुग्णवाहिकांची भर
ग्रामीण भागातील आरोग्याच्या सुविधा अधिक बळकट व्हाव्यात म्हणून जिल्हा नियोजनच्या निधीमधून बोदवड, न्हावी, अमळगाव , पिंपळगाव हरेश्वर , मेहुणबारे, भडगाव व समया रुगणालय येथे नव्या आठ रुग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत. त्या रुग्णवाहिकांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अल्पबचत भवनच्या समोरील मैदानावरून हिरवी झेंडी दाखवून ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना करण्यात आल्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात नाशिक जिल्हयातील ही खासगी शाळा राज्यात प्रथम…५१ लाखाचे बक्षिस मिळणार

Next Post

येवल्यात भुजबळांनी जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा केली ही टीका (बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Screenshot 20240303 163333 WhatsApp

येवल्यात भुजबळांनी जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा केली ही टीका (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011