बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

स्पेनच्या युवतीवर झारखंडमध्ये सामूहिक बलात्कार…चार जणांना अटक

by India Darpan
मार्च 3, 2024 | 12:31 pm
in संमिश्र वार्ता
0
rape2

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रांचीः झारखंडमध्ये स्पेनच्या युवतीवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. स्पेनमधील ट्रॅव्हल व्लॉगर या पीडितेने इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये वेदनादायक घटनेचा भयानक अनुभव शेअर केला आहे. चेहऱ्यावरच्या जखमा दाखवत व्हिडीममध्ये पीडित महिलेने स्पॅनिशमध्ये संदेश दिला आहे.

ही महिला आणि तिचा साथीदार दोन मोटरसायकलवरून बांगला देशातून झारखंडमधील दुमकाला येत होते. बिहार आणि नंतर नेपाळला जाण्याचा त्यांचा बेत होता. ही पीडित महिला म्हणते, “आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत. माझ्यावर सात जणांनी बलात्कार केला. त्यांनी आम्हाला मारहाण करून लुटले. आम्ही पोलिसांसोबत हॉस्पिटलमध्ये आहोत. आमच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि आम्हाला ठार मारण्याची धमकी दिली. तेथे सात लोक होते. रांचीपासून तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या हंसदिहा पोलिस ठाण्यात ही घटना घडली. दोघेही तात्पुरत्या तंबूत रात्र काढत होते.

या घटनेबाबत दुमका पोलिस अधीक्षक पीतांबर सिंह खेरवार यांनी महिलेवर बलात्कार झाल्याची माहिती दिली. सातही आरोपींची ओळख पटली असून त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित तिघांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. महिलेच्या पार्टनरने महिलेने सांगितले, की ती झोपली असताना काही स्थानिक तरुणांनी तंबूत घुसून तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी तिला मारहाणही केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ताडोबा येथे वाघांच्या जतनाबाबत अभिनेत्री रविना टंडन यांनी केले हे कौतुक…

Next Post

शिरूर लोकसभा मतदारंसघात अजितदादांची वाढली डोकेदुखी…स्वपक्षीय नेत्यांनी असा केला विरोध

India Darpan

Next Post
ajit pawar11

शिरूर लोकसभा मतदारंसघात अजितदादांची वाढली डोकेदुखी…स्वपक्षीय नेत्यांनी असा केला विरोध

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011