अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मेळघाटातील भोकरबर्डी येथे दारू पिण्यासाठी आईने पैसे न दिल्याच्या रागातून दारुड्या मुलाने आईचा खून केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी आईची हत्या करणाऱ्या मुलाला ताब्यात घेतले असून पवन जांबेकर असे मुलाचे नाव आहे. तर गंगाबाई मोतीलाल जांबेकर असे आईचे नाव आहे.
गंगाबाई जांबेकर यांच्या बँकेच्या खात्यात पीएम किसान सन्मान योजनेचे पैसे आल्याची माहिती पवनला मिळाली. पीएम किसान सन्मान निधीचे पैसे बँकेत आले असूनदेखील आई पैसे देत नसल्याच्या रागातून त्याने आईशी वाद घातला. आईने विरोध केल्यामुळे संतापलेल्या पवनने काठीने आईला मारहाण केली.
अवघ्या शंभर रुपयांसाठी आईला मारहाण केल्याने ती गंभीररित्या जखमी झाली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी या बाबत माहिती पोलिसांना कळवल्यानंतर दारुडा मुलाला ताब्यात घेण्यात आले.