मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील बीएनएम कॉलेज मध्ये शिकणा-या संकेत भोसलेच्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मनमाड मध्ये भिमसैनिकांचा कॅडल मार्च काढला
बौध्द समाजाच्या संकेत भोसलेची व त्याच्याच साथिदारांनी किरकोळ कारणावरुन हत्या केल्याची घटना घडली होती. त्याच्या साथिदारांनी त्याला बोलवत अंमली पदार्थ पाजले. त्याला अज्ञात स्थळी नेण्यात नेऊन त्याच्यावर अमानवी कृत्य केले. त्याच्या घरच्यांनी त्याचा शोध घेत त्याला उपचारासाठी मुंबईत दाखल केले. मात्र १० दिवसापूर्वी त्याचे निधन झाले.
स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप त्याच्या कुटूंबाने केला असून या घटनेची चौकशी करुन दोषींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी मनमाड शहरातून भिमसैनिकांनी कॅन्डल मार्चच काढला. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत निघालेल्या या कॅन्डल मार्च मध्ये मोठ्या संख्येने भिमसैनिक सहभागी झाले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ कॅंन्डल मार्च पोहचल्यावर तेथे संकेत भोसले याला श्रध्दांजली वाहण्यात आली.