इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे : आजच्या काळात मोबाईल ही अवश्य गोष्ट मानली जाते, अगदी लहान मुलांच्या हातातही मोबाईल दिसून येतो. मात्र या मोबाईलचे फायदे आहेत, त्याचप्रमाणे दुष्परिणाम देखील आहेत. विशेषतः लहान मुलांवर मोबाईलमुळे आरोग्यावर खूपच वाईट परिणाम होतो. त्याहीपेक्षा मुले हट्टी व चिडचिडी होतात, त्यातच मोबाईल दिला नाही म्हणून अनेक राज्यात विविध ठिकाणी लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत, अशातच पुणे नजीकच्या पिंपरी चिंचवड भागात एका मुलीने आई-वडिलांनी मोबाईल दिला नाही म्हणून रागाच्या भरात आत्महत्या केल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आईवडिलांनी मोबाइल देण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या मुलीने त्यांच्या राहत्या घराच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. खाली पडल्याने तिचा जागी मृत्यू झाला.
मोबाईल मुलांचा जणू काही लाडका मित्र बनला आहे, अनेकांना तर तो जीव की प्राण वाटतो, मोबाईल नसेल तर मुले अस्वस्थ होतात, त्यातूनच अनेक ठिकाणी मोबाईल दिला नाही म्हणून अनेक शाळकरी मुलांनी आपले जीवन संपवल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशीच वाईट घटना देहूत घडली आहे. मोबाईल दिला नाही म्हणून दहावीत शिकणाऱ्या आर्या हिने या पंधरा वर्षीय मुलीने रागाच्या भरात अत्यंत टोकाचा निर्णय घेतला आहे. या मुलीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले. सातव्या मजल्यावरून खाली पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना देहू येथे बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. ती दहावीच्या वर्गात शिकत होती.
आर्याचे वडील गणेश सावंत आणि आई दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. ते मूळचे सांगोला येथील आहेत. कामानिमित्त ते देहूत राहतात. सावंत दाम्पत्याला दोन मुली होत्या. त्यात आर्या मोठी मुलगी होती. रात्रीचे जेवण झाल्यावर आर्याने आईकडे मोबाईल मागितला मात्र आईवडिलांनी मोबाइल देण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या आर्या हिने त्यांच्या राहत्या घराच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली.