इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क
दिल्ली – भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावड़े यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात १९५ उमेदवार असून त्यात उत्तर प्रदेश ५१, पश्चिम बंगाल २६, मध्य प्रदेश २४ , गुजरात १५, राजस्थान १५, केरल १२, तेलंगाना ९, असम ११ झारखंड ११ , छत्तीसगढ़ ११, दिल्ली ५, जम्मू कश्मीर २, उत्तराखंड ३ ,अरूणाचल प्रदेश २, गोवा १ , त्रिपुरा १, अंदमान-निकोबार १ और दमन दीव १ सीट चा समावेश आहे.
या यादीत ३४ मंत्री आणि राज्यमंत्रीची नावे आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गांधीनगर येथून उमेदवारी जाहीर केली आहे. या यादीत २८ महिला, ५० पेक्षा कमी वयाचे ४७ युवा उमेदवार, अनुसूचित जाती २७, अनुसूचित जनजाती १८, ओबीसी ५७ अशा विविध वर्ग, समाज आणि जातींना या यादीत प्रतनिधित्व देण्यात आले असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले..