मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील अनेक गावांना दुष्काळाच्या झळा जाणवत असून गिरणा धरणातून पांझण डाव्या कालव्याच्या माध्यमातून गुरांसाठी व पिण्यासाठी पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी सात गावातील नागरीकांनी मालेगाव-चाळीसगाव मार्गावर सुमारे दोन तास भर उन्हात रास्ता रोको आंदोलन केले.
गिरणा धरणात ५७ टक्के जलसाठा उपलब्ध असून त्यातून पांझण डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याची आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.या रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
अखेर पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात येऊन येत्या सहा तारखे पर्यंत पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी या गावातील नागरीकांनी दिला आहे.