नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भरदिवसा धाडसी घरफोडी करत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे सव्वा आठ लाखाचा ऐवज लंपास केला. देवळाली कॅम्प परिसरात गुरूवारी ही घरफोडी झाली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयुर अरूण शेटे (रा.दत्त पेट्रोल पंपा शेजारी,सावरकरनगर,विजयनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेटे कुटुंबिय गुरूवारी कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून ही धाडसी घरफोडी केली.
घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातून रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ८ लाख ३८ हजार १०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे करीत आहेत.