इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामतीः राज्य सरकारच्या नमो महारोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार एका व्यासपीठावर आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे साधारण पावणे अकरा वाजता बारामतीत येणे अपेक्षित होते; मात्र नियोजित कार्यक्रमामुळे त्यांना बारामतीत यायला उशीर झाला. अजित पवारांनी त्यांचे बारामतीत विमानतळावर स्वागत केले. गेल्या ही दिवसांपासून नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेतून शरद पवारांचे नाव वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळाच चर्चा रंगली होती. त्यानंतर त्यांनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली. ती मान्य करण्यात आल्याने शरद पवार नमो रोजगार मेळाव्याला उपस्थित राहिले आहेत.
बारामतीत मेळावा सुरू झाला आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर सुरू झालेल्या या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेत शरद पवार यांना बोलावण्यात आले, अशी चर्चा झाली. दुसरीकडे शरद पवार यांनी मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे आमंत्रण देऊन गुगली टाकल्याने नवीन निमंत्रण पत्रिका छापून त्यामधे शरद पवार यांचे नाव छापण्यात आले. फडणवीस यांनी शरद पवार यांच्या निमंत्रणाला उत्तर देत पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे भोजनास येणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.