नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुन्या वैमनस्यातून तरुणाचा चाकूचा सपासप वार करुन खून झाल्याची धक्कादायक घटना मखमलाबाद नाका येथे घडली. सागर विष्णू शिंदे (२८) असे मृत युवकाचे नाव आहे. तीन ते चार जणांना हा हल्ला करुन ते फरार झाले आहे. या हल्लेखोरांचा पोलिस शोध घेत आहे.
शुक्रवारी ही दुपारी घटना घडली त्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली. सागर यांचे याच परिसरात राहणा-या केदार सांहेबराव इंगळे यांच्याशी जुना वाद होता. या वादातून बदला घेण्याच्या इराद्याने हा खून करण्यात आला. दुपारी मयत सागर शिंदे व त्याचा मित्र आकाश इंगळे, योगेश वाघ हे बंद मद्यपान करत असतांनाची माहिती केदार इंगळे याला कळताच त्याने हा हल्ला केला. इंगळे बरोबर त्याचे काही मित्र सोबत होते.
अगोदर या दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर चाकू हल्ला करण्यात आला. या हल्लात सागर शिंदे याचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये खूनाच्या घटनेचे सत्र थोडे थांबलेले असतांना पुन्ही ही घटना घडली.