इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामतीः बारामती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीत मोठा धक्का देण्याची शक्यता आहे. शिवतारे यांनी विधानसभेबाबत उमेदवारी निश्चित केल्याशिवाय लोकसभेसाठी काम करणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.
ते म्हणाले, की विधानसभेच्या भूमिका स्पष्ट होत नाही, तोपर्यंत विधानसभेच्या बाबतीत निर्णय होणार नाही. तोपर्यंत सबुरीची भूमिका घेतली आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबतीत स्पष्ट करतील, तेव्हाच त्यायातून मार्ग निघू शकतो. पूर्वी पक्ष वेगळे होते. आम्ही परस्परांचे राजकीय विरोधक होतो. आता परिस्थिती बदलली आहे. नेत्यांनी जरी सांगितले तरी लोक आता ऐकतील, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे विधानसभेची खात्री दिल्याशिवाय लोकसभेसाठी लोक काम करू शकणार नाही, असे शिवतारे यांनी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार जुन्या सहकाऱ्यांची साथ घेत आहेत. या पार्श्वभूमीवर पवार यांच्याशी झाली आहे का, या प्रश्नावर त्यांनी शरद पवार किंवा अजित पवार यापैकी कुणाशीही बोलणे झालेले नाही, असे ते म्हणाले. महायुतीत असल्याने अजित पवार यांच्या भेटीगाठी होतात; मात्र लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भेटीगाठ झालेली नाही, असे शिवतारे यांनी स्पष्ट केले आहे.