नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तिडके कॉलनी भागात हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त असलेल्या युवतीने पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. सलोनी संजय हेरेकर (२४, रा. विजयनगर सिडको) असे मृत युवतीचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलोनी हेरेकर या युवतीस हृदयविकाराचा त्रास होता. काही दिवसांपूर्वीच तिचा साखरपुडा झाला होता. नातेवाइकांनी सलोनीला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देत लग्न पुढे ढकलले होते.
या विवंचनेतून तिने शुक्रवारी (दि.१)उडी घेतल्याचे समजते. याबाबत डॉ.भुषण देवरे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गाढवे करीत आहेत.