इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर: आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर उतरल्यास किमान सहा जागांवर जिंकू, असा दावा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केल्यामुळे महाविकास आघाडीसमोर अडचणी वाढल्या आहे. त्यांना हा दावा केला असला तरी महाविकास आघाडीसोबत चर्चेचे दरवाजे शेवटपर्यंत खुले ठेवण्याचे त्यांनी जाहीर केले. युती न झाल्यास आमची स्वबळाची यादी तयार आहे, असे ते म्हणाले.
ॲड. आंबेडकर यांनी महाविकास आघाडीकडून लोकसभा जागावाटपाच्या चर्चेत सहभागी करून घेत जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. लोकसभा जागावाटपाच्या चर्चेत आम्हाला उपरे ठेवले आहे, त्यांची चर्चा झाली,की नंतर ते आम्हाला बोलवतात,अशा शब्दांत त्यांनी नाराजीला व्यक्त केली. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेनेत घमासान युद्ध सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
शिवसेना आणि काँग्रसमधीलव वाद संपला, की वंचितचा उपरेपणा संपेल, असे सांगून ॲड. आंबेडकर यांनी म्हणाले, की ४८ उमेदवारांची तयारी केल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीतील पक्षांनी ताकद पाहून जागा मागाव्यात, असा टोला त्यांनी लगावला.