इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकच्या डावखुरा फिरकीपटू गोलंदाज प्रतीक तिवारी याने बी सी सी आय च्या विनू मंकड करंडक स्पर्धेत दिल्लीविरुद्ध केवळ १८ धावांत ४ बळी अशी अतिशय प्रभावी कामगिरी करत १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या विजयांत मोठा वाटा उचलला .
स्पर्धेतील महाराष्ट्राचा पहिला सामना दिल्लीशी झाला. महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ५ बाद ३१६ धावा केल्या, त्या कर्णधार किरण चोरमलेच्या नाबाद शतकाच्या ( १०५ धावा ) जोरावर. उत्तरादाखल दिल्ली संघ प्रतीक तिवारीच्या भेदक गोलंदाजीसमोर ४९ षटकांत सर्वबाद २३७ पर्यंतच मजल मारू शकला . शिवाय प्रतीकने २ जणांना धावबाद करण्यात हि हातभार लावला .नाशिकच्या डावखुरा जलदगती गोलंदाज रोहन शेडगेनेहि १ बळी घेतला व महाराष्ट्र संघाने ७९ धावांनी शानदार विजय मिळवत विनू मंकड करंडक स्पर्धेत विजयी सुरुवात केली.
महाराष्ट्राचा पुढील सामना – १४ ऑक्टोबर – हैद्राबाद
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतीकचे अभिनंदन करून यापुढील स्पर्धेतील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.