बुधवार, सप्टेंबर 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

१०८’ रुग्णवाहिकेने जळगाव जिल्ह्यात तब्बल इतक्या लाख रूग्णांचे वाचवले प्राण… अशी होते उपलब्ध

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 13, 2023 | 6:20 pm
in स्थानिक बातम्या
0
Untitled 53

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रूग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’ मुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये जिल्ह्यातील २ लाख ७१ हजार ८७५ नागरिकांचे प्राण वाचले आहेत‌. हृदयविकाराचे रूग्ण, अपघातग्रस्त व्यक्ती ते गर्भवती महिला अशा अनेकांचा यामध्ये समावेश आहे. ५१ हजार ५०३ महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात हलविण्यात यश आले असून १ हजार १९८ बाळांचा जन्म रूग्णवाहिकेत झाला आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘१०८’ या आपत्कालीन रूग्णसेवेचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला असून रूग्णांना जलद व तत्पर सेवा देण्याचे काम रूग्णवाहिकांनी करावे. या मोफत सेवेबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहचवावी‌. अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, बीव्हीजी इंडिया कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक डॉ.राहूल जैन, जिल्हा समन्वयक आतिष सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ‘१०८’ रूग्णवाहिकेच्या रूग्णसेवेची आकडेवारी सादर करण्यात आली.

कोरोना काळात देखील ‘१०८’ रूग्णवाहिकेने मोलाची भूमिका निभावली असून या रूग्णवाहिकेमध्ये कृत्रिम श्वसन यंत्रणा, औषधी, शॉक मशिन, ऑक्सिजन सिलेंडर व सोबत डॉक्टर उपलब्ध राहत असल्यामुळे आरोग्य विभागावरील बराच ताण कमी झाला आहे. राज्यात २०१४ पासून सप्टेंबर २०२३ पर्यंत ९१ लाख २१ हजार ९७४ रुग्णांना १०८ रूग्णवाहिकेमुळे जीवदान मिळाले आहे.

कोविड काळातही महत्त्वाची भूमिका
कोरोना काळात ३५ रुग्णवाहिकांनी १५ हजार ७९३ कोविडच्या रुग्णांना सेवा दिली असून १ लाख १६ हजार ९१६ नॉन कोविड रुग्णांसाठी मार्च २०२० ते सप्टेंबर २०२३ दरम्यान सेवा बजावली आहे. तसेच विविध आजारांच्या ६४ हजार ४५८ रुग्णांना रूग्णवाहिकेने सेवा दिली आहे.

रूग्णांना मिळाली संजीवनी
जळगाव जिल्ह्यात २०१४ पासून ते आतापर्यंत अपघातग्रस्त २० हजार ६२५ रूग्ण तसेच हाणामारीचे ४ हजार ४१५ रुग्णांना तर, १ हजार ४५जळीत रूग्णांना, त्याच प्रमाणे छातीत दुखण्याचे १ हजार ५५८ रुग्ण, उंचावरून पडणे ४ हजार ५२८ रुग्ण, विषबाधा झालेले १२ हजार ६४६ रुग्णांना, इलेक्ट्रिक शॉक लागलेल्या ३२५ रुग्णांना, ७९५ मोठ्या अपघातातील रुग्णांना सेवा दिली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ३३१ रूग्णांना सेवा मिळाली आहे.

वाढत्या दुर्घटना लक्षात घेऊन रुग्णाला तात्काळ आरोग्य सेवा मिळावी यासाठी बीव्हीजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था व एनएचएम महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘१०८’ रुग्णवाहिका सुरू केली असून आपातकालीन वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी ‘१०८’ रुग्णवाहिकेचा मोठा आधार मिळत आहे. असे डॉ. राहुल जैन यांनी सांगितले.

रुग्णवाहिका कशी उपलब्ध होते ?
राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘१०८ रुग्णवाहिका’ सेवा ही तातडीच्या उपचारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. १०८ या मोफत मदत क्रमांकावर (टोल फ्री क्रमांकावर) संपर्क साधून ही रुग्णवाहिका मागवणे शक्य आहे. १०८ च्या सुसज्ज आणि अद्ययावत नियंत्रणकक्षाद्वारे नजीकच्या रुग्णवाहिकेला रुग्णापर्यंत पोहोचण्यास मदत केली जाते. त्यामुळे कमीत कमी वेळात प्राथमिक, तसेच अनेकदा अगदी तातडीचे उपचारही १०८ मध्ये उपलब्ध झाल्याने रुग्णांचा जीव वाचतो.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

१०० एकर जागेत सभा….१० फूट उंच स्टेज….मनोज जरांगे पाटील यांच्या आजच्या सभेकडे…. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष

Next Post

येवल्यात धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन…..आठवले, भुजबळ एकाच व्यासपीठावर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी प्रकृतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या,बुधवार, २४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 23, 2025
Rumion with Six Airbags 1
संमिश्र वार्ता

टोयोटा रूमियनच्‍या सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये आता ६ एअरबॅग्‍जस

सप्टेंबर 23, 2025
नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आढावा बैठकीचे आयोजन 2 1024x683 1
राज्य

नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या जागेवरील वन विभागाचे आरक्षण रद्द व्हावे…मंत्री छगन भुजबळ

सप्टेंबर 23, 2025
Sushma Andhare
संमिश्र वार्ता

फक्त भाजप वगळून इतर सगळ्यांची प्रकरणे हातात कशी काय येतात…सुषमा अंधारे यांचा दमानियांना प्रश्न

सप्टेंबर 23, 2025
DCM 2 1140x570 1 e1753180793322
मुख्य बातमी

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतके कोटी मंजूर, नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता…केंद्राकडे प्रस्ताव सादर

सप्टेंबर 23, 2025
jail11
क्राईम डायरी

डे व डे मिलन मटका खेळणा-या तीन जुगारीना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सप्टेंबर 23, 2025
road 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील रस्त्यांच्या वार्षिक देखभाल-दुरुस्ती कामांसाठी इतक्या कोटींच्या निधीस मान्यता

सप्टेंबर 23, 2025
Saurrath २०२५ 2
संमिश्र वार्ता

नाशिक परिमंडळात २५ हजार ग्राहकांनी बसविली ५८ मेगावॅट क्षमतेची सौर यंत्रणा….सौर प्रचार रथाला प्रारंभ

सप्टेंबर 23, 2025
Next Post
IMG 20231013 WA0266

येवल्यात धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन.....आठवले, भुजबळ एकाच व्यासपीठावर

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011