इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – विधीमंडळाच्या आवारात शिंदे गटाचे दोन नेते आपापसात भिडल्याने त्याचा पडसाद आज विधीमंडळात पडले. तर या दोघांच्या भांडणामुळे राजकीय चर्चाही रंगू लागल्या आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर याची चांगलीच चर्चा रंगली. या घटनेनंतर शिंदे गटाने असे काहीच झाले नाही. केवळ दोघांमध्ये वरच्या आवाजाच चर्चा झाली. पण, धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत असून तसे काहीच झाले नसल्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.
या वादावादी नंतर आमदार थोरवे यांनी सांगितले की, वारंवार पाठपुरावा करुनही दोन महिन्यांपासून माझ्या मतदार संघातील रस्त्यांच काम त्यांनी केले नाही. बोर्ड मिटिंगमध्ये हा विषय मांडला नाही. मी त्यांना आज जाब विचारला, तेव्हा ते माझ्याशी नीट बोलले नाहीत, मग शाब्दीक बाचाबाची झाली. दादा भुसे हे सगळ्यांशीच उद्धटपणाने वागतात. भाजप आणि एनसीपीचे मंत्री हे एकमेकांना संभाळून घेत असतात. पण आमच्याकडे असं होत नाही. मुख्यमंत्री प्रेमाने वागतात, पण मंत्री उद्धटपणे बोलतात, हे आम्ही खपवून घेणार नाही असेही थोरवे यांनी सांगितले.
या वादावादीनंतर राष्ट्रवादीचे पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या घटनेकडे विधानसभेत लक्ष वेधले. ही घटना गंभीर असून याची चौकशी करणे गरजेचे आहे. गँगवार दाराशी आल्याचेही त्यांनी सांगत सत्ताधा-यांवर टीका केली.