मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुकीच्या तारखा केव्हाही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीच्या जागा वाटपासाठी आता वेगवेगान हालचाली सुरु आहे. महायुतीच्या जागा वाटपाचा फॅार्म्युला दिल्लीत ठरणार आहे. तर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला राज्यातच जवळपास निश्चित झाला आहे. या जागा वाटपात शिवसेना ठाकरे गटाला २३, काँग्रेस १५ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला १० जागा देण्यात येणार असल्याचे ठरले असल्याची चर्चा आहे.
मित्रपक्षांना शिवसेनेच्या कोट्यातील जागा मिळणार आहेत. लोकसभा मतदारसंघ राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडायला ठाकरे तयार आहेत. अकोल्याची एक जागा वंचित बहुजन आघाडीला सोडली जाण्याची शक्यता आहे. वंचित सोबत आल्यास त्यांना आणखी एक ते दोन जागा दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने तिथल्या सहा जागांपैकी चार जागा शिवसेना लढवणार आहे. उत्तर मुंबईसाठी शरद पवार यांचा पक्ष उत्सुक नसल्याने ही जागाही ठाकरे गट लढवू शकतो. ठाकरे यांच्या कोट्यातून मित्रपक्षाला दोन जागा सोडल्या जाण्याची शक्यता आहे. हातकणंगले
कोल्हापूरच्या जागेचा पेच अजून सुटलेला नाही. ही जागा सध्या शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. तिथे ठाकरे गटाचे खासदार आहेत. काँग्रेसला ही जागा हवी आहे. तिथून शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी काँग्रेसला ही जागा हवी आहे.