शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

देशभरात ४६ ठिकाणी रोजगार मेळ्यात ५१ हजार नियुक्ती पत्रांचे वितरण, महाराष्ट्रात इतक्या जणांना मिळाली संधी

by India Darpan
सप्टेंबर 26, 2023 | 7:40 pm
in राष्ट्रीय
0
IMG 20230926 WA0361 1


इंडिया दर्पण वृत्तसेवा
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे केंद्र शासनाच्या विविध विभागात नव्याने भरती झालेल्या सुमारे 51 हजार उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. देशभरात ४६ ठिकाणी आज या रोजगार मेळ्याचे आयोजन करण्यात त्यात महाराष्ट्रातील पनवेल,नवी मुंबई ,नागपूर, पुणे आणि नांदेड या ठिकाणांचा समावेश होता. या ठिकाणी ८५१ नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले.

नवी मुंबईतील पनवेल इथे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तथा वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल, नागपूरमध्ये केंद्रीय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पुणे इथे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि महिती तंत्रज्ञान तसच कौशल्य विकास आणि उद्योग व्यवसाय राज्यमंत्री राजीव चंदशेखर आणि नांदेड इथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री इथे रावसाहेब‌ पाटील दानवे यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले

आज देशभरातून नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आलेले नवीन कर्मचारी विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत. यामध्ये टपाल विभाग, अणुऊर्जा, महसूल, उच्च शिक्षण आणि संरक्षण मंत्रालयाचा समावेश आहे. रोजगार मेळा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने उचललेलं एक पाऊल असून पुढील रोजगार निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करण्याच्या दृष्टीने आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करण्याच्या उद्देशानं आखलेला उपक्रम आहे.

नवी मुंबईतील पनवेल इथे 356 जणांना नियुक्ती पत्रे प्रदान
नवी मुंबईतील पनवेल इथे झालेल्या रोजगार मेळाव्यात 25 युवक-युवतींना प्रत्यक्ष नियुक्ती पत्र केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तथा वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. भारतीय टपाल विभागाच्या वतीने झालेल्या या रोजगार मेळाव्यात यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्वर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना गोयल म्हणाले,” आज तुम्ही एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहात. तुम्हाला व्यवस्थेचा भाग बनण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे तुम्ही आव्हानांचा सामना करू शकता आणि समाधान मिळवू शकता. तुम्ही इतरांमध्ये जो बदल पाहू इच्छिता तो बना. 140 कोटी भारतीयांच्या जीवनात बदल घडवा. समाजसेवेच्या भावनेने काम करा”.आज पनवेल इथे झालेल्या कार्यक्रमात एकुण 356 युवक-युवतींना टपाल विभाग, संरक्षण विभाग, महसूल विभाग, शिक्षण विभाग, भारतीय अन्न महामंडळ, आरोग्य आणि कुटुंब कल्याण , दूरसंचार विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई सीमा शुल्क विभाग, बी ई एल, आय आय एम, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आदी विभागांसाठी नियुक्ती पत्र देण्यात आले.

नागपुरात 183 जणांना नियुक्ती पत्रे प्रदान
नागपूरमध्ये सुद्धा रोजगार मेळाव्याचं आयोजन धरमपेठ इथल्या वनामती सभागृहात करण्यात आले . ज्ञान ही शक्ती आहे या ज्ञानाचे उद्यमशीलतेमध्ये होणे आवश्यक आहे. तरुणांनी स्वतःच्या पायावर उभे राहून नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावे असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याप्रसंगी केले . गडकरी यांनी नवनियुक्त उमदेवारांना सकारात्मकता , योग्य दृष्टिकोन , भविष्याचा वेध घेऊन काम करण्याचा संदेश दिला . या कार्यक्रमात नागपूर क्षेत्राच्या पोस्ट मास्टर जनरल श्रीमती शुभा मधाळे, भूविज्ञान सर्वेक्षण संस्था -जीएसआय नागपूरचे संचालक प्रशांत काळपांडे प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपुरात झालेल्या रोजगार मेळाव्यात 183 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तपत्राचे वितरण करण्यात आले यामध्ये सर्वाधिक टपाल विभागाचे 114 ,त्यानंतर आयकर विभागातील 26, भूविज्ञान संशोधन संस्थेतील 7 ,विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील 14, इंडियन ब्युरो ऑफ माईन्स मधील 1, एम्स मधील 1, पंजाब नॅशनल बँक मधील 1 भारतीय खाद्य निगम मधील 17, केंद्रीय लोक निर्माण भवन मधील 2 अशा एकूण 183 नवनियुक्त उमेदवारांचा समावेश होता. गडकरींच्या हस्ते 8 उमेदवारांना प्रतिनिधिक स्वरूपात नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले त्यानंतर उर्वरित उमेदवारांना पोस्टमास्टर जनरल श्रीमती शुभा मधाळे आणि भूविज्ञान सर्वेक्षण संस्थेचे संचालक प्रशांत काळपांडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले.

पुण्यात 193 जणांना नियुक्ती पत्रे प्रदान
सरकारी नोकरीच्या माध्यमातून देशातील नागरिकांच्या जीवनाबरोबरच व्यक्तिगत आयुष्यात देखील महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याची संधी तुम्हाला मिळाली असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन राजीव चंद्रशेखर यानी यावेळी उपस्थित उमेदवारांना केले . पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा येथे आज झालेल्या रोजगार मेळाव्यात एकूण 193 जणांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली . यावेळी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि महिती तंत्रज्ञान तसच कौशल्य विकास आणि उद्योग व्यवसाय राज्यमंत्री राजीव चंदशेखर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . त्यांच्या हस्ते सीमा रस्ते संघटना , भारतीय टपाल विभाग , प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर संकलन विभाग ,भारत हेवी इलेक्ट्रिकल्स , भारतीय गोदाम महामंडळ , वित्तीय सेवा आणि भारतीय भू वैज्ञानिक सर्वेक्षण या सरकारी विभागातील नोकऱ्यांची नियुक्ती पत्रे उपस्थित उमेदवारांना देण्यात आली .

नांदेड इथे 119 जणांना नियुक्ती पत्रे प्रदान
प्रधानमंत्री मोदी यांनी 2047 च्‍या भारताचे स्‍वप्‍न डोळयासमोर ठेवून पुढील 25 वर्षाचे न‍ियोजन केले आहे. या काळात आपल्‍याला देशाची सेवा करण्‍याची संधी म‍िळत आहे आणि‍ देशाच्‍या सुवर्ण काळात नोकरी उपलब्‍ध होत आहे असे केंद्रीय राज्‍यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले. नांदेड येथील न‍ियोजन भवनात आयोज‍ित करण्‍यात आलेल्‍या नवव्‍या रोजगार मेळाव्‍याला केंद्रीय रेल्‍वे कोळसा आण‍ि खन‍िज राज्‍य मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची प्रमुख उपस्‍थीती होती. या मेळावाच्‍या माध्‍यमातून समाजात‍ील सर्व वर्गाला समाव‍िष्‍ठ करण्‍यात आले असल्‍याचेही दानवे यांनी सांगीतले.

यावेळी खासदार प्रतापराव पाटील च‍िखलीकर, आमदार रामराव पाटील रातोळीकर, दक्ष‍िण मध्‍य रेल्‍वेच्‍या व‍िभागीय व्‍यवस्‍थापक न‍िती सरकार, विभागीय डाक व्‍यवस्‍थापक अदनान अहमद, ज‍िल्हाध‍िकारी अभ‍िज‍ित राऊत, जि‍ल्‍हा पोल‍िस अध‍िक्षक श्रीकृष्‍ण कोकाटे, ज‍िल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधि‍कारी म‍िनल करनवाल आदींची प्रमुख उपस्थीती होती.

या नवव्‍या रोजगार मेळाव्‍याच्‍या माध्‍यमातून नांदेड येथे डाक व‍िभाग, भारतीय अन्‍न महामंडळ, महाराष्‍ट्र ग्रामीण बँक, आयकर व‍िभाग, केंद्रीय लोकन‍िर्माण व‍िभागाच्‍या शंभराहुन अध‍िक बेरोजगार युवकांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते न‍ियुक्‍तीपत्र देण्‍यात आले. यात भारतीय डाक व‍िभागाच्‍या 94 तर इतरव व‍िभागाच्‍या 25 न‍ियुक्‍तीपत्रांचा समावेश आहे. या मेळाव्‍यामध्‍ये महाराष्‍ट्रातील नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, धार‍ाश‍िव. लातूर, भुसावळ, जळगाव या ज‍िल्‍हयातील युवकांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते न‍ियुक्‍तपत्र देण्‍यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ब्राझीलच्या शिष्टमंडळाची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट, या विषयावर झाली चर्चा

Next Post

दुर्दैवी घटना….मनमाडला पाणी भरताना शॉक लागून महिलेचा मृत्यू

Next Post
IMG 20230926 WA0416 1

दुर्दैवी घटना....मनमाडला पाणी भरताना शॉक लागून महिलेचा मृत्यू

ताज्या बातम्या

IMG 20250509 WA0290 1

नाशिक येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मे 9, 2025
IMG 20250509 WA0316 1

भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर…महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली ही माहिती

मे 9, 2025
Untitled 20

आतापर्यंत भारत – पाक सीमेवर नेमकं काय घडलं?…पत्रकार परिषदेत दिली ही माहिती

मे 9, 2025
Nitin Gadkari e1713956790376

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १ हजार ३८० कोटी रुपयांच्या या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन…

मे 9, 2025
1 2 1920x1026 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा…दिले हे निर्देश

मे 9, 2025
accident 11

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार मायलेकी जखमी

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011