नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अपे सहा सिटर गाडी सोडवण्यासाठी दोन हजाराची लाच मागणा-या अहमदनगर जिल्ह्यातील राहाता पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदारा विरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे कडील अपे सहा सिटर गाडी ही पोलीस हवालदार काळोखे यांनी दि.1/2/2024 रोजी अडवून राहाता पोलीस स्टेशन येथे लावली होती. सदरची गाडी सोडून देण्यासाठी काळोखे हे तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रूपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर कार्यालयाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार २ फेब्रुवारी रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली, पडताळणी कारवाई दरम्यान यातील आरोपी लोकसेवक काळोखे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे दोन हजार रुपयाची लाचेची मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून आज दिनांक 29/02/2024 रोजी राहाता पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
लाच मागणी गुन्हा अहवाल*
युनिट – अहमदनगर
तक्रारदार- पुरुष वय- 22 वर्ष, रा.भीमनगर, नवीन बाजारतळ, शिर्डी, ता.राहाता, जि.अहमदनगर
आरोपी
आलोसे सुधाकर प्रल्हाद काळोखे, पोलीस हवालदार, बक्कल नंबर 549, नेमणूक राहाता पोलीस स्टेशन, जि. अहमदनगर
लाचेची मागणी- 2000/-₹
लाचेची मागणी दिनांक- 02/02/2024
*लाचेचे कारण – तक्रारदार यांचे कडील अपे सहा सिटर गाडी ही आरोपी लोकसेवक काळोखे यांनी दि.1/2/2024 रोजी अडवून राहाता पोलीस स्टेशन येथे लावली होती व सदरची गाडी सोडून देण्यासाठी आरोपी लोकसेवक काळोखे हे तक्रारदार यांच्याकडे 2000/- रूपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर कार्यालयाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार दिनांक 02/02/2024 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली, पडताळणी कारवाई दरम्यान यातील आरोपी लोकसेवक काळोखे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे 2000/- रू. लाचेची मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून आज दिनांक 29/02/2024 रोजी राहाता पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
हैश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*सापळा अधिकारी:-राजू आल्हाट, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर
*पर्यवेक्षण अधिकारी- प्रवीण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर
*सापळा पथक -मपोना.राधा खेमनर, पोना.किशोर लाड, पोलीस अंमलदार बाबासाहेब कराड, चालक- पोलीस हवालदार दशरथ लाड,