नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा परिषदेच्या अंतर्गत १८ विभाग येतात या प्रत्येक विभागांतर्गत अधिकारी व कर्मचारी येतात. प्रत्येक विभागांतर्गत ग्रामीण भागात सेवा देत असतांना अधिकारी, कर्मचारी हे उत्कृष्ठ काम करत असतात अशा उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्या कामाची माहिती इतरांपर्यंत पोहचावी व त्यांच्याशी अनौपचारिक चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी यांच्या संकल्पनेतून कॉफी विथ सीईओ या उपक्रमाला सुरवात करण्यात आली. या उपक्रमाच्या आजच्या भागात आरोग्य व महिला बालविकास या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष गाव पातळीवरती उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात उपस्थित कर्मचारी यांनी विभागांतर्गत काम करत असतांना येणाऱ्या अनुभवांचे कथन करत अडचणींवर मात करून केलेल्या कामांविषयी माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची माहिती घेत त्यांचे कौतुक केले. त्याचबरोबर प्रशासकीय पातळीवर चांगले काम करत असतांना अडचणी आल्यास त्याबाबत विभागस्तरावरून मदत करण्यात येईल असे सांगत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आरोग्य विभागातून प्राथमिक आरोग्य केंद्र कोचरगाव, दिंडोरी येथील परिचारिका सारिका तुपसाखरे, प्राथमिक आरोग्य केंद्र अंबोली त्र्यंबकेश्वर येथील आरोग्यसेवक वाल्मिकी मोकळ, प्राथमिक आरोग्य केंद्र धामनगाव, इगतपुरीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप वेढे त्याचबरोबर महिला व बलविकास विभागातील नागशेववाडी सुरगाणा येथील मिनी अंगणवाडी सेविका जयनंदा सूर्यवंशी, गणेशगाव, नाशिक येथील अंगणवाडी मदतनीस सरला घोटे, धामनगाव इगतपुरी येथील अंगणवाडी पर्यवेक्षिका सुखदा पाराशरे, सुरगाणा येथील अंगणवाडी पर्यवेक्षिका मंगल गायवान या कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, नाशिक तालुक्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे हे उपस्थित होते.
कर्मचारी व त्यांची उल्लेखनीय कामगिरी –
1) आरोग्य – सारीका तूपसाखरे (पद स्टाफ नर्स) कोचारगाव प्राथमिक आरोग्य केंद्र दिंडोरी
सारीका तूपसाखरे मॅडम यांनी 1 एप्रिल 2023 ते 30 जानेवारी 2024 पर्यंत ७० पेक्ष्या डिलिव्हरी यशस्वीरिता केलेले आहेत.
2) आरोग्य – वाल्मिकी मोकळ (पद एम पी डब्ल्यू) गाव अंबाई, प्राथमिक आरोग्य केंद्र आंबोली तालुका त्रंबकेश्वर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबाई या गावांमध्ये डायरियाचे पाच ते सात रुग्ण एकाच दिवशी आढळून आले तदनंतर वाल्मिकी मोकळ याना शंका आल्याने गावातील पाण्याची S-FORM | IHIP) टेस्ट घेऊन संबंधित जिल्हा यंत्रणेला कळवली त्यानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणा यांच्याशी समन्वय साधून त्यांनी गावामध्ये आलेली डायरीयाची साथ पूर्णपणे पसरण्याच्या आधीच नियंत्रित केली वाल्मिकी मोकळ यांच्या प्रसंगावधानतेमुळे होणारी मोठी हानी टळली.
3) आरोग्य – डॉक्टर संदीप वेढे (पद वैद्यकीय अधिकारी) प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव, इगतपुरी
डॉक्टर संदीप वेढे यांनी विविध प्राथमिक आरोग्य केंद्र दवारे कुटुंब नियोजनाच्या एका वर्षात सर्वाधिक 265 Vasectomy शस्त्रक्रिया यशस्वी केलेले आहेत.
4) मबावि – जयनंदा पांडुरंग सुर्यवंशी, मिनी अंगणवाडी सेविका, नागशेवडीपाडा, प्रकल्प सुरगाणा
गरोदर स्त्रीया व स्तनदा माता यांना प्रभावी स्तनपान व आहार विषयी माहिती दिली त्यामुळे सुपोषित बालके जन्माचे प्रमाण वाढले तसेच कार्यक्षेत्रातील कुपोषणाचे प्रमाणात घट झाली. सॅम मॅम बालकांसाठी लोकसहभागातून गुळ शेंगदाणे व अंडे तसेच अ मायलेज युक्त पिठाची लापसी व शिरा करून खाऊ घातला त्यामुळे सॅम श्रेणीतील बालके नॉर्मल श्रेणीत गेली व ज्ञान बालके साधारण श्रेणीत गेली. लोकसहभागातून ग्रामपातळीवर पोषण महा पोषण पंधरवडा समुदाय आधारित कार्यक्रम असे विविध कार्यक्रम राबवून लाभार्थी मध्ये पोषण विषयक जनजागृती केली.
5) मबावि – सरला घोटे, अंगणवाडी मदतनीस, गणेशगांव नाशिक
रोज सकाळी साडेसात वाजता अगणवाडी उघडणे हे नियमित सुरू आहे. यादरम्यान पौष्टिक कसा असेल यावर भर दिला, आहारात वैविध्य आणले.स्तनपान व पौष्टिक आहार विषयक मातांना मार्गदर्शन केल्याने कुपोषणाच्या प्रमाणात घट झाली पोषण पंधरवडा मध्ये मुलांची रॅली पोषण आहार विषयक कार्यक्रम सीबीड़ इव्हेंट्स घेतले. लेक लाडकी योजने विषयक गृहभेटीतून मार्गदर्शन केले पालकांना फॉर्म भरून घेण्यात मदत केली.
6)मबावि- सुखदा पाराशरे, ICDS पर्यवेक्षिका, बीट धामनगाव 1-2, प्रकल्प इगतपुरी KVK YCMOU च्या मार्गदर्शनातून परसबाग व शेवगा लागवड प्रशिक्षण घेण्यात आले. काही गावे दत्तक घेऊन शेवगा अभियान घेतले. राष्ट्रीय पोषण ममाह व स्तनपान सप्ताह इत्यादि द्वारे जनजागृती केली.
7) मबावि – मंगल गायवण – ICDS पर्यवेक्षिका, प्रकल्प सुरगाणा
नवरात्रीच्या निमित्ताने ‘घटस्थापना करू नवदुर्गेची आरंभ सोबत बालविकासाची : आरंभ – सुरवातीचे क्षण मोलाचे’ नावाचे अभियान केले. या माध्यमातून गावांमध्ये, विशेषतः रात्री बालकाचा शारीक विकास, भावनिक विकास, बौद्धीक विकास व सामाजीक कौशल्ये विकसिक होण्यासाठी सुजाण पालकत्व, माझीमाती माझेगाव ही थीम घेऊन स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारे मीलेट धान्य, है वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. पथनाट्य, सांस्कृतिक उपक्रम याद्वारे बाल विवाह, पोषण, बाल शिक्षण यावर जन जागृती केली.