इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची चांगलीच गोची झाली आहे. अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघावरचा दावा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा पवित्रा घेतल्याने आढळराव यांना आता कोणत्याही परिस्थितीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आज त्यांनी मतदार संघातील लोक प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तर घड्याळ चिन्हावर लोकसभा लढवायला तयार असल्याचे सांगितले. फक्त याबाबतच निर्णय ६ मार्च नंतर होईल असेही त्यांनी सांगितले.
आढळराव पाटील जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले नाही, तर अजित पवार यांनी भाजपच्या प्रदीप कंद यांना अमोल कोल्हे यांच्या विरोधात रिंगणात उतरवण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. त्यामुळे आढळराव यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय जवळपास घेतला आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटलांच्या उपस्थितील बैठकीला आढळराव उपस्थित होते. त्यावेळेसच हा निर्णय झाला असला तरी त्यांनी मतदार संघात त्याची चाचपणी केल्याचे बोलले जात आहे.
आढळरावांनी यांची आज सायंकाळी त्यांच्या समर्थकांची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत चर्चा झाली. अजितदादांनी मंचरमध्ये चार तारखेला सभा ठेवली आहे. त्यासभेत एकतर आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. लोकसभेची आचारसंहिता १५ तारखेच्या आत लागू शकते.