सोमवार, ऑगस्ट 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी…

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 29, 2024 | 7:59 pm
in राष्ट्रीय
0
modi 111

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या स्थापनेला मंजुरी दिली असून या आघाडीचे मुख्यालय भारतात असेल. वर्ष 2023-24 ते 2027-28 या पाच वर्षांच्या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी एकवेळची अर्थसंकल्पीय तरतूद म्हणून दीडशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली.

वाघ, इतर महा मार्जार प्रजातीमधील प्राणी तसेच नामशेष होत चाललेल्या प्रजातींच्या संवर्धनासाठी भारताने घेतलेल्या आघाडीच्या भूमिकेची नोंद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक व्याघ्र दिन 2019 निमित्त केलेल्या भाषणात जागतिक नेत्यांच्या आघाडीला आशियात सुरु असलेल्या शिकारीला आळा घालण्याचे आवाहन केले. भारताच्या व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 9 एप्रिल 2023 रोजी आयोजित कार्यक्रमात त्यांनी याचा पुनरुच्चार केला. याच कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी महामार्जार प्रजातीच्या प्राण्यांचे तसेच त्यांच्या निवासी जागांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय बिग कॅट आघाडीच्या स्थापनेची औपचारिक घोषणा केली. वाघ आणि या जातीच्या इतर प्राण्यांच्या संवर्धनासाठी अग्रणी आणि दीर्घकाळ उपयुक्त ठरणाऱ्या भारतातील प्रचलित पद्धती इतर अनेक देशांमध्ये देखील राबवल्या जाऊ शकतात.

बिग कॅट अर्थात महामार्जार जातीच्या प्राण्यांमध्ये वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबट्या, पुमा, जग्वार आणि चित्ता या सात प्राण्यांचा समावेश होत असून त्यापैकी वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबट्या आणि चित्त हे पाच प्राणी भारतात आढळतात.

महा मार्जार प्रजाती आढळणारे तसेच या प्राण्यांच्या संवर्धनात स्वारस्य असलेले आणि या प्राण्यांचे अस्तित्व नसलेले जगातील 96 देश, संवर्धनातील भागीदार तसेच महा मार्जार प्रजातीमधील प्राण्यांच्या संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत शास्त्रीय संघटना यांसह या कल्याणकारी कार्यात योगदान देऊ इच्छिणारे व्यवसाय समूह आणि कॉर्पोरेट उद्योग यांच्या युतीतून निर्माण झालेली एक बहु-राष्ट्रीय, बहु-संघटना आघाडी म्हणून आंतरराष्ट्रीय महा मार्जार आघाडीची स्थापना करण्यात आली. महा मार्जार प्रजातीच्या प्राण्यांच्या संख्येतील घसरणीला आळा घालून त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करण्यासाठी संवर्धन विषयक कार्यक्रमाला बळकटी देण्यासाठी आर्थिक पाठबळासह यशस्वी पद्धती आणि मनुष्यबळ यांच्या केंद्रीकृत भांडाराचा सामायिक मंच उपलब्ध करण्यासाठी लक्ष्यित पद्धतीने या सर्वांचे जाळे उभारून त्यांच्यात समन्वय विकसित करणे हा या आघाडीच्या स्थापनेचा उद्देश आहे. या प्राण्यांचा अधिवास असलेले देश आणि इतरांना एका सामायिक मंचावर आणण्याच्या दृष्टीने महा मार्जारविषयक कार्यक्रमात आघाडीच्या स्थानावरून उचललेले हे प्रात्यक्षिकस्वरूपी पाऊल असेल.

संवर्धन विषयक कार्यक्रम पुढे नेण्यामध्ये परस्पर लाभांसाठी देशांदरम्यान परस्पर सहकार्य प्रस्थापित करणे हे आयबीसीएचे लक्ष्य आहे. विविध क्षेत्रांमध्ये पायाचा विस्तार करणे तसेच एकमेकांमध्ये बंध निर्माण करण्यासाठी विविधांगी दृष्टीकोन स्वीकारून, ज्ञानाचे सामायीकीकरण, क्षमता निर्मिती, नेटवर्किंग, सल्ला सेवा, आर्थिक तसेच साधनसंपत्तीविषयक पाठबळ, संशोधन आणि तंत्रज्ञानविषयक मदत, शिक्षण तसेच जागरुकता निर्माण करण्यात मदत करणे हे या आघाडीचे उद्दिष्ट आहे. शाश्वत विकास आणि उपजीविकेच्या सुरक्षिततेसाठी या प्राण्यांना शुभंकर म्हणून वापरुन भारत आणि या प्राण्यांचा अधिवास असलेले देश पर्यावरणीय लवचिकता तसेच हवामान बदलांच्या परिणामांचे उपशमन करण्याचे मुख्य प्रयत्न सुरु ठेवू शकतात. त्याचसोबत नैसर्गिक परिसंस्था सातत्याने विकसित होतील आणि आर्थिक तसेच विकासात्मक धोरणांमध्ये मध्यवर्ती स्थान मिळवतील असे भविष्य घडवण्याचा मार्ग देखील प्रशस्त करू शकतील.

सुवर्ण मानक व्याघ्रकुळ संवर्धन पद्धतींच्या अधिक प्रचारासाठी सहयोगी मंचाच्या माध्यमातून ताळमेळ राखणे, निधींचा निधी आणि तांत्रिक माहितीच्या केंद्रीय सामायिक भांडारात प्रवेश पुरवणे, विद्यमान प्रजाती-विशिष्ट आंतरसरकारी मंच बळकट करणे, संवर्धन आणि संरक्षण यावरील आंतरराष्ट्रीय उपक्रम आणि दुवे यांना बळकटी देणे, हवामान बदलाचे प्रतिकूल परिणामांचे क्षमन करण्यासाठी आणि आपले पर्यावरणीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी साहाय्य करणे, आयबीसीएमध्ये परिकल्पित आहे.

आयबीसीएच्या आराखड्यामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये व्यापक आधार आणि दुवे प्रस्थापित करण्याचा बहुआयामी दृष्टीकोन असेल आणि ज्ञानाचे आदानप्रदान, क्षमता बांधणी , नेटवर्किंग, ऍडव्होकसी, वित्त आणि संसाधन समर्थन, संशोधन आणि तांत्रिक समर्थन, शिक्षण आणि जागरूकता यामध्ये मदत होईल. प्रजाती असलेल्या विविध देशांमधील ब्रँड ॲम्बेसेडर ही संकल्पना पुढे नेण्यात मोठी भूमिका निभावतील आणि संपूर्ण प्रक्रियेतील महत्त्वाचे भागधारक असलेल्या युवा आणि स्थानिक समुदायांसह जनतेमध्ये व्याघ्रकुळ संवर्धन-मोहिम राबवण्यासाठी प्रोत्साहन देतील. सहयोगात्मक कार्यवाहीभिमुख दृष्टिकोन आणि पुढाकाराच्या माध्यमातून देशाचे हवामान नेतृत्व योगदान देऊ शकेल आणि आयबीसीए मंचाद्वारे वर्धित हरित अर्थव्यवस्थेचे प्रकल्प राबवणे शक्य होईल. अशाप्रकारे, व्याघ्रकुळ आघाडी सदस्यांचा पुढाकार, संवर्धन आणि समृद्धीला नवा आकार देऊ शकतात.

आंतरराष्ट्रीय व्याघ्रकुळ आघाडी सर्वांगीण आणि सर्वसमावेशक संवर्धन परिणाम साध्य करण्यासाठी शाश्वत विकास उद्दिष्टांसह जैवविविधता धोरणे एकत्रित करण्याचे महत्त्व ओळखते. जैवविविधता संवर्धन प्रयत्नांना स्थानिक गरजांनुसार संरेखित करणाऱ्या आणि आयबीसीए सदस्य देशांमध्ये संयुक्त राष्ट्रे शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योगदान देणाऱ्या धोरणात्मक उपक्रमांसाठी वर नमूद केलेल्या बाबी समर्थित आहेत. क्षेत्रीय धोरणे आणि विकास नियोजन प्रक्रियांमध्ये जैवविविधतेचा विचार एकत्रित करण्यासाठी सर्व क्षेत्रांमध्ये जैवविविधता मुख्य प्रवाहात आणणे; कृषी, वनीकरण, पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासह; शाश्वत जमीन-वापर पद्धती, अधिवास पुनर्संचयित उपक्रम, आणि जैवविविधतेच्या संवर्धनास पाठबळ देणारे आणि हवामान बदल, अन्न सुरक्षा, स्वच्छ पाणी व दारिद्र्य कमी करण्याशी संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये योगदान देणाऱ्या परिसंस्थेवर आधारित दृष्टिकोनांना प्रोत्साहन देणे, आवश्यक आहे.

आयबीसीएच्या प्रशासनात सदस्यांची सभा, स्थायी समिती आणि भारतातील मुख्यालय असलेले सचिवालय यांचा समावेश होतो.कराराचा आराखडा (सांविधिक )बहुतांश करून आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे आणि आंतरराष्ट्रीय सुकाणू समितीद्वारे त्याला अंतिम रूप दिले जाईल. संस्थापक सदस्य देशांच्या नामांकित राष्ट्रीय केंद्रबिंदूंसह सुकाणू समिती स्थापन केली जाईल.

आघाडीच्या आमसभेत आयबीसीए आपल्या स्वतःच्या महासंचालकांची नियुक्ती करेपर्यंत पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे नियुक्त महासंचालक आयबीसीए सचिवालयाचे हंगामी प्रमुख असतील. भारत सरकारचे पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री आयबीसीए आमसभेत मंत्रीस्तरीय अध्यक्षपद भूषवतील.

आयबीसीएने भारत सरकारचे 150 कोटी रुपयांचे प्रारंभिक पाठबळ पाच वर्षांसाठी (2023-24 ते 2027-28)प्राप्त केले आहे. वाढीव निधीसाठी, द्विपक्षीय आणि बहुपक्षीय संस्थांचे योगदान; इतर योग्य संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि देणगीदार संस्था यांच्याकडून आर्थिक साहाय्य जमवणे आणि शोधण्याचे कार्य यापुढे केले जाईल.

आयबीसीए नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर सुनिश्चित करेल आणि हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांचे क्षमन करण्यासाठी प्रयत्न करेल . व्याघ्रकुळ आणि त्यांच्या निवासस्थानांचे रक्षण करून आयबीसीए नैसर्गिक हवामान अनुकूलता, पाणी आणि अन्न सुरक्षा आणि या परिसंस्थांवर अवलंबून असलेल्या हजारो समुदायांच्या कल्याणासाठी योगदान देईल.आयबीसीए परस्पर लाभासाठी देशांमध्ये सहकार्य वृद्धिंगत करेल आणि दीर्घकालीन संवर्धन कार्यक्रम पुढे नेण्यात मोठे योगदान देईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दहावीची उद्यापासून परिक्षा….१६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थीची नोंदणी

Next Post

शिवसेना शिंदे गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील जाणार अजित पवार गटात…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 117

शिवसेना शिंदे गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील जाणार अजित पवार गटात…

ताज्या बातम्या

Untitled 2

ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची धमकी…नेमकं घडलं काय

ऑगस्ट 3, 2025
unnamed 6

नाशिक जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेला सुरवात…विरल आणि अन्यना यांची उत्तम कामगिरी

ऑगस्ट 3, 2025
crime 12

मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले…वेगवेगळया भागातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

ऑगस्ट 3, 2025
image0037LA4 e1754183811326

जळगावात जमले भारताचे भावी बुद्धिबळपटू: ११ वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात

ऑगस्ट 3, 2025
IMG 20250802 WA0467 e1754183550323

मठाच्या माधुरी हत्तीणी स्थलांतराबाबत वनताराने केली आपली भूमिका स्पष्ट….

ऑगस्ट 3, 2025
3 1024x683 1

दीडशे दिवस उपक्रमात होणार अनुकंपाच्या सर्व पदांची भरती…अतिरिक्त जिल्हाधिकारी होणार आरडीसी

ऑगस्ट 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011