पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण विभाग, अमेझॉन फ्युचर इंजिनिअर, लीडरशीप फॉर इक्विटी आणि कोड टु एनहान्स लर्निंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे तीन दि.२१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय कॉम्पुटर सायन्स हॅकेथॉन उत्सव अमेझॉन डेव्हलपमेंट सेंटर, विमान नगर येथे आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील हिरापुर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची नाशिक जिल्ह्यातुन निवड करण्यात आली होती. यामध्ये चांदवड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी राज्यात पारितोषिक पटकावले.
राज्यातील जिल्हा परिषद, मनपा शाळामधील मधील ग्रामीण आणि शहरी तेवीस हजार विद्यार्थ्यानी पहिल्या टप्प्यात नोंदणी करून सहभाग घेतला होता. त्यापैकी दहा हजार विद्यार्थ्यानी अनप्लग (कम्प्युटर शिवाय) चॅलेंज सोडवले होते. या विद्यार्थ्यापैकी या अनप्लग चॅलेंज मधील अचूक मांडणी आणि उत्तमपणे कामगिरी केलेल्या मुलांची या निकषा आधारे जिल्हास्तरावर पन्नास शाळांमधील १६२ विद्यार्थ्याची कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सवासाठी निवड करण्यात आली होती. आणि जे जिल्हास्तरावर ज्यांची निवड झाली असे ९ जिल्ह्यातील १४ शाळांमधील १४ शिक्षक आणि ४६ विद्यार्थी होते.
या राज्यस्तरीय उत्सवामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरापूर (दरसवाडी ) चे शिक्षक सुनील मधुकर बच्छाव आणि त्यांचे विद्यार्थी पुष्कराज बच्छाव, साची सिमंत,अनुष्का चव्हाण यांनी शहरातील तरुणांमध्ये अपघाताने मृत्यूचे वाढते प्रमाण कारण अल्कोहोल पिऊन रस्त्यावर गाडी चालवणे. या समस्येवर उपाय म्हणून कार साठी अल्कोहोल डिटेक्टर डिवाइस कोडींग मार्फत तयार करून गाडीच अल्कोहोल डिटेक्ट करून गाडी चालवण्यास प्रतिबंध करेल. या डिवाइस साठी राज्यात पाचवा क्रमांक पटकावला. राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन केले