नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओढा येथे रेल्वेखाली झोकून देत ४५ वर्षीय अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना अप रेल्वे लाईनवर घडली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात सदर इसमाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उपस्टेशन प्रबंधक समाधान विठ्ठल सुरवाडे यांनी याबाबत पोलीसात खबर दिली आहे. मालगाडी चालकाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि.२८) रात्री ही घटना घडली.
ओढा येथील अप रेल्वे लाईनवर एका अनोळखी ४५ वर्षीय पुरूषाने मालगाडी समोर उडी घेवून आत्महत्या केली. सदर इसमाची अद्याप ओळख पटली नसून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.