नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रक्कम देण्यात आल्याचे भासवून बनावट कागदपत्राच्या आधारे मिळकतीचे दस्त नोंदविण्यात आल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोकन देवून मिळकत खरेदी विक्रीत वृध्दास तब्बल ८५ लाखास गंडा घालण्यात आल्यामुळे हा प्रकार पोलिस ठाण्यात पोहचला.
या फसवणूक प्रकरणी सुभाष धनजी वरू (६६ रा.धवल बंगला,विसेमळा कॉलेजरोड) यांनी फिर्याद दिली आहे. सुधीर सुनिल बोडके, संदिप सुनिल बोडके, समिर सुनिल बोडके (रा.सर्व साई नगर,नाशिक पुणे रोड) व रामनाथ लहानू लोखंडे (रा.भाभानगर,मुंबईनाका) अशी सशियतांची नावे आहेत.
फिर्यादी वरू यांची थत्तेनगर येथील सर्व्हे नंबर ७१५ मधील २-१ ही मिळकत खरेदीसाठी संशयितांनी २००७ मध्ये संपर्क साधला होता. १० ऑक्टोबर रोजी याबाबत २ कोटी ७५ लाखात व्यवहार झाला होता. संशयितांनी यावेळी २ हजार १०० रूपयांचे टोकन दिले होते. यावेळी झालेल्या दस्तात संशयितांनी ठरलेली रक्कम नमूद न करता ८५ लाख एक हजार रूपयांचे धनादेश व रोख रक्कम दिल्याचे भासवून तसेच बनावट दस्त तयार करून त्याची सबरजिस्टारकडे नोंदणी केली.
अनेक वर्ष उलटल्यानंतरही संबधीतांनी व्यवहाराची रक्कम अदा न केल्याने वरू यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे करीत आहेत.
……