नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तपास अधिकारी म्हणून अभिप्राय देण्यासाठी धुळे येथील आझाद नगर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आरिफअली सैय्यद युसुफअली सैय्यद (५५) हे ४० हजार रुपयाची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्याकडून दाखल गुन्ह्यात आरिफअली सैय्यद युसुफअली सैय्यद हे तपास अधिकारी असून, सदर गुन्ह्यात गोठवण्यात आलेली विम्याची रक्कम मिळणेकरिता कोर्टात दाखल केलेल्या अर्जावर तपास अधिकारी यांचा अभिप्राय देण्याकरिता पंचांसमक्ष ५० हजाराची लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोडी अंती ४० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. सदर लाचेची ४० हजार आरिफअली सैय्यद युसुफअली सैय्यद यांनी स्वतः स्वीकारल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – ला.प्र.वि, धुळे
तक्रारदार- पुरुष, 38 वर्ष.
आलोसे – *आरिफअली सैय्यद युसुफअली सैय्यद, वय-55
सहा.पोलीस उपनिरीक्षक, आझाद नगर, पोलीस स्टेशन,धुळे जि. धुळे.
*लाचेची मागणी- 50,000/-
तडजोडी अंती 40,000 /- रुपये दिनांक 27/02/2024
*लाच स्वीकारली* – 40,000 /- रुपये दिनांक 29/02/2024
*लाचेचे कारण –
यातील तक्रारदार यांच्याकडून दाखल गुन्ह्यात आलोसे हे तपास अधिकारी असुन, सदर गुन्ह्यात गोठवण्यात आलेली विम्याची रक्कम मिळणेकरिता कोर्टात दाखल केलेल्या अर्जावर तपास अधिकारी यांचा अभिप्राय देण्याकरिता वर नमुद आलोसे यांनी पंचांसमक्ष 50,000/- लाचेची मागणी करून तडजोडी अंती 40,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. सदर लाचेची रक्कम 40,000/- आलोसे यांनी स्वतः स्वीकारल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
*पर्यवेक्षण अधिकारी – अभिषेक पाटील, पोलीस उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
*सापळा अधिकारी – मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
*सहा.सापळा अधिकारी -हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
*सापळा पथक– पो. हवा. राजन कदम,पो.ना. संतोष पावरा,रामदास बारेला, प्रविण पाटील,सुधीर मोरे, मकरंद पाटील, प्रशांत बागुल.