नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदावरी नदी पात्रात ५० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. सदर महिलेने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला याबाबत उलटसुलट चर्चेस उधाण आले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि.२८) रात्रीच्या सुमारास गोपालदास समाधी मंदीर परिसरातील नदीपात्रात ५० वर्षीय अनोळखी महिला पाण्यात तरंगतांना आढळून आली. पाण्याबाहेर काढून तिला तात्काळ उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.
सदर महिलेची अद्याप ओळख पटली नसून याबाबत शिपाई महाले यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार शेवाळे करीत आहेत.