नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्मार्ट सिटी कंपनीमार्फत बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र येथे रॉ वॉटर पाईप लाईन मधून कनेक्शन करणे तसेच ६०० मीमी व्यासाचे पवन नगर रायझिंग मेनचे कनेक्शन जोडणी इ. कामे करण्याचे नियोजन असल्यामुळे नाशिकमध्ये कोणत्या भागात पाणीपुरवठा होणार नाही याची माहिती नाशिक महानगरपालिकेने दिली आहे.
स्मार्ट सिटी कंपनीचे काम सुरु असल्यामुळे गंगापूर डॅम पंपींग स्टेशन येथील ओ साईडचे पंपींग बंद ठेवावे लागणार आहे. यामुळे गंगापूर डॅम पंपींग स्टेशन येथून १) बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र २) पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र ३) निलगिरी बाग जलशुध्दीकरण केंद्र ४) गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र ५) नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र येथे होणारा पाणी पुरवठा दि. ०२/०३/२०२४ रोजी बंद राहणार आहे.
तरी शनिवार दि. ०२/०३/२०२४ रोजी बारा बंगला, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर व नाशिकरोड येथून होणारा पाणी पुरवठा संपूर्ण दिवस बंद राहील. तसेच रविवार दि. ०३/०३/२०२४ रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी प्रमाणात कमी दाबाने होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.