ओझर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भारतात द्राक्ष शेतीसाठी चार वर्षांपूर्वी इस्रायल मधून सोळा वाण आयात केलेल्या पैकी गेंट पर्ल या द्राक्ष वाणाचा उत्कृष्ठ वाण म्हणून सन्मान झाला. नाशिक येथे संपन्न झालेल्या यंदाच्या नाशिक ग्रेप हार्वेस्ट महोत्सवात सदर जातीस प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
इस्रायल येथील संशोधक डॉ.अवी पर्ल यांनी यावर काम केले. शिरीष कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात पाच गुणवंत द्राक्ष उत्पादकांनी सदर जातीच्या द्राक्षांची लागवड केली. चार वर्षांनी त्यावर सातत्य राखत चव, आकार,रंग व इतर गुणवत्ता बघून त्यावर पारितोषिकाची मोहोर उलटली आहे. समारंभाच्या दिनी संशोधक पर्ल अबू, शिरीष कोठारे यांना पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई राठोड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या द्राक्षांची लागवड अमित पाटील, माणिकराव पाटील, सीताराम कदम, भास्करराव शिंदे यांनी केली आहे.
जातीची लागवड यावर बऱ्याच बाबी अवलंबून
द्राक्ष शेती करताना सातत्य आणि नवीन जातीची लागवड यावर बऱ्याच बाबी अवलंबून असतात.शिरीष कोठारे यांचे मिळालेले मार्गदर्शन चार वर्ष यावर केलेले काम निसर्गात होणारे बदल या सर्वच बाबींचा विचार करता आमच्या पाच जणांच्या समूहाने केलेले कष्ट फळास आले आहे. यापुढे ही नवीन वाण आणि संशोधन आणि लागवड यावर सातत्याने काम करत राहणार आहे.
भास्करराव शिंदे
कृषीरथ ऍग्रो एक्सपोर्ट