इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
झारखंड जामतारा येथील काळझारिया रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अंग एक्सप्रेसला आग लागल्याचे कळाल्यानंतर काही प्रवासी यांनी रेल्वेतून उडी घेऊन दुस-या ट्रकवर गेले. या ट्रॅक वरुन येणारी झाझा – आसनसोल रेल्वे खाली आले. त्यांना या रेल्वेने चिरडले.
या अपघातात मृतांचा नेमका आकडा समोर आला नसला तरी १२ जणांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. या अपघातानंतर वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिकांनी दिली ही माहिती
या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात नेण्यात आले आहे. स्थानिक नागरीक देखील बचाव कार्यात पोलिसांना मदत करत आहेत. जामताडा आणि करमाटांडच्या दरम्याव कालाझरिया रेल्वे हॉल्टवर आसनसोल-झाझा ट्रेन थांबली होती. याच ट्रेनमधून प्रवासी खाली उतरले होते. यादरम्यान भागलपूर-यशवंतपुरम एक्सप्रेस तिथून जात होती. यावेळी रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या अनेक प्रवाशांना ट्रेनने धडक दिल्याची माहिती येथील स्थानिकांनी दिले.