नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारताला उत्तम तंत्रज्ञानाची व अत्याधुनिक उपचारांची आवश्यकता आहे. उपचार परवडणारे असलेच पाहिजेत पण त्यात एक्सलन्स अधिक महत्वाचा भाग आहे. अत्याधुनिक उपचारांचे एसएमबीटी मॉडेल देशात आदर्श बनेल असे प्रतिपादन प्रख्यात शास्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युट टाटा मेमोरियल सेंटर यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाने साकारल्या जाणाऱ्या विशेष सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भूमिपूजन सोहळा आणि एसएमबीटी केअर प्लस, एसएमबीटी बोन मॅरो ट्रान्सप्लांट, एसएमबीटी टेलीमेडीसीन, एसएमबीटी ई-कॅम्पस या विविध सेवा उपक्रमांच्या शुभारंभ प्रसंगी डॉ. माशेलकर बोलत होते. याप्रसंगी आमदार बाळासाहेब थोरात, माजी विधानपरिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे, टाटा मेमोरियल सेंटरचे डॉ एस. डी. बनवली, डॉ पंकज चतुर्वेदी, डॉ राहुल पुरवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ते म्हणाले, रुग्णालय उत्तम दर्जाचे असले की ते महाग असते असे म्हटले जाते. मात्र, एसएमबीटी वेगळे हॉस्पिटल आहे, कमीत कमी दरांत गुणवत्तापूर्ण उपचार द्यावयाचे आहेत सोबत एक्सलन्सदेखील टिकवून ठेवायचे असे ते म्हणाले. एसएमबीटी हॉस्पिटलने केलेल्या इम्युनोअॅक्ट थेरपीच्या करारावर ते म्हणाले की, ही सेवा ग्रामीण भागात मिळू लागल्यावर अनेक रुग्णांची सोय होणार आहे. एसएमबीटी हॉस्पिटल भारतासाठी नव्हे तर जगासाठी उत्तम उदाहरण होईल गौरवोद्गार डॉ. माशेलकर यांनी काढले. इम्यूनसेल बाहेर काढून ट्रेन केल्या जातात व व या सेल परत आत पाठवून कॅन्सरच्या पेशींचा नाश त्या करण्यास सक्षम केल्या जातात. भारताला उत्तम तंत्रज्ञानांची आणि तितक्याच चांगल्या उपचारांची आवश्यकता आहे. मी स्वत: मराठी शाळेत शिकलो पण काही बिघडले नसल्याचे ते म्हणतात उपस्थित मान्यवरांनी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट केला.
कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, एसएमबीटी कॅम्पसमध्ये आजचा क्षण हा चिरस्मरणीय असा आहे. एसएमबीटी एक नवा टप्पा गाठला आहे. देशातील दर्जेदार उपचार इथे होत आहेत याचा अभिमान आहे. एसएमबीटी केवळ हॉस्पिटल नसून १० ते १२ हजार लोकसंख्येचे गाव आहे. एसएमबीटीमुळे परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. एसएमबीटीने खूप नावलौकिक मिळवावा खूप पुढे जावे असे म्हणत येथे काम करणाऱ्या प्रत्येकाच्या कष्टाचे हे फळ असल्याचे याप्रसंगी आमदार थोरात म्हणाले. याप्रसंगी, माजी विधानसभा सदस्य डॉ. सुधीर तांबे यांच्यासह डॉ जयश्री थोरात यांनीही उपस्थितांना संबोधित केले.
प्रारंभी, एसएमबीटी केअर प्लस म्हणजेच २०० बेड्सचे सुसज्ज असे स्पेशल रूमच्या विंगचे डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यानंतर याच विंग मध्ये असलेल्या बोन मरो ट्रान्सप्लांटचे उद्घाटन– कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. यांनतर नव्याने बांधकाम होणाऱ्या एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युटचा दिमाखात भूमिपूजन सोहळा याठिकाणी पार पडला. एसएमबीटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदानावर टेलीहेल्थ आणि ई-कॅम्पसचे ऑनलाईन स्वरुपात उद्घाटन झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एसएमबीटीचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. हर्षल तांबे यांनी केले. त्यांनी एसएमबीटी हॉस्पिटलचा प्रवास उलगडत अनेक यशस्वी टप्प्यांबाबत सांगितले. याप्रसंगी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, टाटा मेमोरियल सेंटरचे डॉ एस. डी. बनवली, डॉ पंकज चतुर्वेदी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, इम्युनोअक्टचे संस्थापक डॉ. राहुल पुरवार, मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे, कर्करोग तज्ञ डॉ. हसमुख जैन, मविप्रचे सरचिटणीस अड नितीन ठाकरे, मेटच्या शेफाली भुजबळ, विजय करंजकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बोन मॅरो ट्रान्सप्लांट व कार-टी सेल थेरपीला एसएमबीटीत सुरुवात
सेल आणि जीन थेरपीमध्ये गेल्या दहा वर्षात खूप संशोधन झाले आहे. इतर देशात हि थेरपी सुरु आहे; मात्र तिथे खर्च खूप मोठा आहे. कमीत-कमी खर्चात भारतात असे संशोधन झालेले आहे. आजपासून इम्युनोअक्ट थेरपी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे सुरु झाल्याचे इम्युनोअक्टचे संस्थापक डॉ. राहुल पुरवार यांनी जाहीर केले. याआधी झालेल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये दोन रुग्णांवर ही थेरपी यशस्वी करण्यात आली आहे.
एसएमबीटी व टाटा उभारणार २०० खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल
आज भूमिपूजन झालेले एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युटमध्ये टाटा मेमोरियल सेंटरच्या तांत्रिक मार्गदर्शनाने २०० बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल लवकरच साकारले जाणार आहे. टाटा मेमोरियल सेंटरचे डॉ पंकज चतुर्वेदी यांनी एसएमबीटी वटवृक्ष असल्याचे म्हणत यापुढे सर्वकाही सहकार्य एसएमबीटीसाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन वर्षापूर्वी जेव्हा करार झाला त्यानंतर वाटले नव्हते एसएमबीटी एवढे मोठे काही करू शकेल असे म्हणत टाटा मेमोरियल सेंटरपेक्षाही मोठे हॉस्पिटल एसएमबीटी होऊ शकते असे गौरवोद्गार त्यांनी काढले.