नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी त्यांच्या काश्मीर भेटीचा तपशील सामायिक केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे :”दौऱ्याबाबत जाणून घेणे खूप सुखावह आहे! जम्मू आणि काश्मीरला तेंडुलकर यांनी दिलेल्या सुखद भेटीने युवकांपर्यंत दोन महत्त्वाचे संदेश पोहोचवले आहेत: एक – #IncredibleIndia च्या वेगवेगळ्या भागांना भेट देऊन त्यांची ओळख करून घेणे
दोन- ‘मेक इन इंडिया’चे महत्त्व. चला मिळून विकसित आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करूया!”