विकास गिते, सिन्नर
सिन्नर मधील सामाजिक राजकीय सांस्कृतिक तसेच सर्वांना आपलेसे करणारे भगत परिवारातील कृष्णाजी भगत यांचे चिरंजीव मनोज कृष्णाजी भगत यांचा आज २९ फेब्रुवारी वाढदिवस तीन वर्षातून एकदा येणाऱ्या या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक राजकीय प्रवासाचा घेतलेला हा धांडोळा.. समाजकारणात व राजकारणात वावरताना सर्वांना आपलेसे करून संकटकाळी मदतीला धावून जाणारे जनसामान्यासह अनेकांना आपलेसे करणारे मनोज भगत यांची समाजातील छबी काही वेगळीच आहे..
शैक्षणिक, साहित्यिक, धार्मिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रगणी असलेले सिन्नर वाचनालयाचे अध्यक्ष तथा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक कृष्णाजी भगत यांच्या कुटुंबात मनोजचा जन्म झाला भगत कुटुंबियांच्या संस्कारात वाढलेल्या मनोजला समाजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. घरात कुटुंबीयात आणि विशेषता मित्र मंडळ मनोज बाळा नावाने परिचित गणेश पेठेतील असलेले फ्रेंड्स बुक स्टॉल नावाची फर्म .त्यातच मातोश्री नर्मदा मंगल कार्यालयाचे एवढा अवाढव्य कारभार सांभाळताना मनोजने पेठेसह शहरातून मित्रांची माया जमवली कोणीही मित्र अडचणीत असल्याचे मनोजला समजले की मनोज मदतीसाठी तत्पर मनोजने आपल्या मंगल कार्यालयात अनेकांना मदतीचा हात देत अतिशय कमी व वाजवी दरात कार्य करून दिले. हे सांगण्याचे एकच तत्पर आहे की मनोजला या गोष्टी कोणाला सांगावे वाटत नाही. त्याला आपली वाहवा केलेली ही पटत नाही. पण त्याचे हे कार्य समाजापुढे आले पाहिजे हाच आमचा चांगला हेतू असून त्यांनी आत्तापर्यंत शिक्षणासाठी अनेकांना प्रेरणा दिली असून ग्रामीण भागातही त्यांचे अनेक मित्र हे कॉलेज जीवनापासून जोडलेले आहे.
राजकारणात व समाजकारणात मनोजचे नाव घेतले जाते. सामाजिक कार्याची आवड असलेले मनोज भगत यांनी नाशिक वेस परिसरातील विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला असून त्यांच्यावर एक नाही दोनदा विश्वास ठेवून नगरपालिकेत प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना दिली आहे. मनोजने मिळालेल्या संधीचे सोने करताना प्रभागातील अनेकांना मदतीचा हात देत अनेक नागरिक समस्या सोडवले आहे. सर्व राजकारणात समाजकारणात मनोजचे मित्र हे जोडलेले असून मनोजने अनेकांना आपल्या सामाजिक कार्याने आपलेसे केले आहे. हे सर्व करीत असताना मनोजने कुटुंबातील मोठे असल्याचे आपले कार्यही अतिशय खुबीने निभवले आहे. कारण आपल्या काकाची उणीव मनोजने कधीही आपल्या भावांना होऊ दिली नाही. सर्वांना प्रेमाने समजून घेतले. सर्वांना शिक्षणाच्या संधी दिल्या स्वतः एक उत्तम शेतकरी उद्योजक व व्यावसायिक असल्याने आपल्या भावांवर तसेच मुलांवर योग्य मुलतत्वे संस्कारीत असा योग्य भार त्यांच्यावर दिला व प्रत्यक्षेत्रात आज कुटुंबियातील त्यांचे बंधू मुले हे वाटचाल करीत आहे.
कुटुंबात दादा नावानेच त्यांना संबोधले जाते दादा म्हणजे कुटुंबियातील प्रमुख पण दादाने कुटुंबियातील घडी अतिशय सुरेख अशी बसवली असून कुटुंबातील व्यक्ती दादाचे शब्द हे प्रमाण मानतो दादानेही कधीही प्रत्येकाला आपला मित्र म्हणूनच त्यांना मदतीचा हात दिला आहे. मित्रांच्या बाबतीत म्हणाल तर मनोजने असंख्य मित्र हे लहानांपासून तर ज्येष्ठांपर्यंत कमवले आहे श्रीमंती ही येते जाते. पण मित्र हे जीवनात एकदाच येतात हे मनोज चे वाक्य अजूनही माझ्या मनाला घर करून बसले आहे. कोणालाही कधी मनोजने नाराज केले नाही. रागावला जरी असेल पण मायेने त्याने तेवढ्याच आपुलकीने त्याला जीव लावलेला मी मनोजला बघितले आहे. सत्य हे सत्यच असते कारण मनोज हा अतिशय सरळ मार्गे चालणारा मनुष्य असून कोणाचेही कार्यामध्ये तो आपले घरातली कार्य आहे. असे समजूनच प्रत्येकाला मंगल कार्यालयात मदत करतो कोणी जर नसेल तर स्वतः मनोजला मी काम करताना कार्यालयात बघितले आहे. कोणत्याही पदाचा बडे जवा न करता मनोज यांनी आपले कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे.
पुस्तकाने घडवले मनोजचे आयुष्य….
मनोजने लहानपणी शेतातील भाजी सुद्धा बाजारात विकलेली असून कोणतेही काम हे लहान नसल्याचे तो कायम आम्हाला सांगत असतो डॉक्टरांपासून तर आमदार, खासदार तर छोट्या छोट्या लहान बालकापर्यंत मनोज सर्वांना आपल्या स्मितहास्याने आपलेसे केले आहे. प्रत्येक व्यक्तीशी मनोजचे अतिशय जवळचे नाते असून कधीही त्यांनी या नावाचा बडे जाव केला नाही. मनोजने मंगल कार्यालय शेती आधी व्यवसाय सांभाळताना पुस्तकातील ग्रंथ साहित्यिक याची मनोजला आवड आहे. अनेक पुस्तके त्यांनी आपल्या डोळ्याखालून घातलेले असून फावल्या वेळात पुस्तकाचे अवलोकन करीत असतात पुस्तक वाचले तर आपले जीवन नक्कीच बदलते असे ते कायम सांगत असतात वाचाल तर वाचाल या वाक्याने त्यांनी जीवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक पुस्तकांचे अवलोकन व वाचन केले असून अनेक संत महंत सामाजिक व्यक्तिमत्व यांचे पुस्तक वाचलेले असून अजूनही ते फावल्या वेळात पुस्तक वाचन करतात. पुस्तक हा त्यांच्या अतिशय जवळचा मित्र त्यांनी आपल्या शालेय जीवनापासूनच आपल्या हृदयास पकडलेला आहे.
वाढदिवसाचा अनोखा संकल्प
मनोज भगत यांचा वाढदिवस तीन वर्षांनी येत असून त्याची तारीख 29 फेब्रुवारी अशी असून त्यांना वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेक जण प्रोत्साहन करीत असतात पण ते केक न कापता त्यांची मित्र कंपनी ही विविध आधाराश्रम तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देत असतात
ते म्हणाले की, “मुळात वाढदिवस साजरा करण्यात मला रस नाही. वाढदिवसानिमित्त डामडौल करणे, पैशांची उधळपट्टी करणे चुकीचे आहे. मात्र हजारो कार्यकर्ते, मित्र, हितचिंतक हे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. बुके, हार, शाल आणत असतात. त्यांना नाराज करणे शक्य नाही. त्यामुळे बुके, हार, शाल यावर खर्च न करता सर्वांनी वह्या, पेन आदी शालेय साहित्य आणावे. आज समाजातील एक मोठा वर्ग आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. त्यांच्या मुलांना हे शालेय साहित्य वाटप केल्यास थोडासा हातभार लागेल.
वाढदिवसानिमित्त संकलित केलेले शालेय साहित्य तालुक्यातील विविध ठिकाणच्या शाळांमध्ये जाऊन वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की, वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येताना बुके, हार, शाल यावर खर्च न करता सर्वांनी वह्या, पेन आदी शालेय साहित्य आणावे. जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांच्या हास्य जफुलविता येईल. हे हास्य पैशात मोजता येणार नाही.”तरी त्यांच्या सर्व मित्रांनी समाजातील गरजू घटकांसाठी पेन व वह्या आणण्याचे आव्हान केले आहे.