मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

समुद्रात भारतीय नौदलाची अंमली पदार्थ विरोधी मोहीम…इतका साठा पकडला

by India Darpan
फेब्रुवारी 28, 2024 | 5:34 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 114

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तेसवा) – भारतीय नौदल आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने समुद्रात एका समन्वित अभियानाद्वारे ३३०० किलो ग्रॅम प्रतिबंधित (३०८९ किलोग्रॅम चरस, १५८ किलोग्रॅम मिथाॲंफिटामाईन आणि २५ किलो ग्रॅम मॉर्फिन) अमली पदार्थ वाहून नेणारी एक संशयित नौका ताब्यात घेतली आहे.

याबाबत भारतीय नौदलाच्या सागरी टेहळणी विमानांकडून गुप्त माहिती मिळाली होती. तसेच अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने या गुप्त माहितीची शहानिशा केली होती. या माहितीच्या आधारावर, मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अमली पदार्थांसह भारतीय जल सीमेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या एका संशयास्पद नौकेला अडवण्यासाठी भारतीय नौदलाने आखलेल्या मोहिमेत एका युद्धनौकेद्वारे कारवाई करण्यात आली.

या नौकेला रोखून अलिकडच्या काळात अमली पदार्थांचा सर्वात मोठा साठा जप्त करण्यात यश मिळाले आहे. त्यानंतर, ताब्यात घेण्यात आलेले हे जहाज भारतीय नौदलाच्या युद्धनौकेने जवळच्या भारतीय बंदरात खेचून नेले आणि त्यावरील कर्मचारी तसेच प्रतिबंधित अमली पदार्थांचा साठा कायदे अंमलबजावणी संस्थेच्या हवाली केला.

ही कारवाई केवळ जप्त केलेल्या अवैध मालाचे प्रमाण आणि मूल्य या दृष्टीनेच महत्वपूर्ण आहेच शिवाय मकरान किनाऱ्यावरून निघणाऱ्या आणि विविध दिशांना तसेच हिंद महासागर क्षेत्रातील देशांना जाणाऱ्या प्रतिबंधित अमली पदार्थांच्या तस्करीचे मार्ग ध्वस्त करण्यासाठी भारतीय नौदल आणि अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या सहयोगी प्रयत्नांना अधोरेखित करते.

ही यशस्वी समन्वित मोहीम, विशेषत्वाने भारताच्या सागरी सीमा क्षेत्र परिसराचा बेकायदेशीर कृत्यांसाठी वापर करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय नौदलाची मजबूत वचनबद्धता आणि संकल्प अधोरेखित करते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकला प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी सर्वेक्षण सुरू….पोस्टमन घरोघरी जाणार

Next Post

तीन वर्षातून एकदाच येणारा वाढदिवस….असा आहे सिन्नरचे मनोज कृष्णाजी भगत यांचा सामाजिक राजकीय प्रवास

India Darpan

Next Post
IMG 20240228 WA0235 1 e1709124913671

तीन वर्षातून एकदाच येणारा वाढदिवस….असा आहे सिन्नरचे मनोज कृष्णाजी भगत यांचा सामाजिक राजकीय प्रवास

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011