इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः नेता किती मोठा असला तरी त्याला काही गोष्टी टाळता येत नाही. पुणे महानगरपालिकेने दोन वर्षापासून वारंवार नोटीस देऊनही वरीष्ठाच्या दबावामुळे कारवाई केली नाही. पण, अखेर त्यांना कारवाई करावी लागली ती थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिंरजीव व माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर…ही कारवाई कर थकबाकीची असून ती ३ कोटी ७१ लाख रुपयांची आहे.
पुणे महापालिकेच्या कर संकलन विभागाने ही कारवाई करतांना आर डेक्कन मॉलमधील राणे यांच्या मालमत्तेला सील ठोकले आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. पुण्याच्या डेक्कन भागात आर डेक्कन मॉलमध्ये राणे यांची मालमत्ता आहे.
या मालमत्तेचा सुमारे तीन कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांचा कर राणे यांनी थकवला. या थकबाकीप्रकरणी महापालिकेच्या कर संकलन विभागाने राणे यांना वारंवार नोटीस बजावूनही त्यांनी कर भरला नाही. अखेर राणे यांच्या या मालमत्तेला महापालिकेने सील ठोकले. महापालिकेने राणे यांच्या तीन मजल्यांच्या मिळकतीचे वरचे दोन मजले सील केले.