नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली गावातील सोमवार बाजारात गर्दीत महिलेच्या गळय़ातील सुमारे ७५ हजार रूपये किमतीची सोन्याची पोत चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बिस्मी सुरेश (रा.मॅप कॉर्टर अटलरी सेंटर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बिस्मी सुरेश या भाजीपाला खरेदीसाठी सोमवारी (दि.२६) देवळाली गावातील बाजारात गेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास त्या भाजीपाला खरेदी करीत असतांना ही घटना घडली.
गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ७५ हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हातोहात लांबविली. अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत.