माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
……..
मध्य महाराष्ट्र –
आज २८ फेब्रुवारी ते १ मार्च (बुधवार-शुक्रवार) असे ३ दिवस खान्देश नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अशा १० जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. दरम्यानच्या काळात उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगांव नाशिक नगर अशा ५ जिल्ह्यात व लगतच्या परिसरात २८ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यन्त असे ३ दिवस गारपीटीचीही शक्यताही जाणवते.
मराठवाडा –
मराठवाड्यातील संपूर्ण ८ जिल्ह्यात आज २८ फेब्रुवारी ते २ मार्च (बुधवार- शनिवार) असे ४ दिवस ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. बुधवार व गुरुवार २८-२९ फेब्रुवारीला २ दिवस मराठवाडयात गारपीटीचीही शक्यताही जाणवते.
कोकण व विदर्भ –
विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यात परवा शुक्रवार- शनिवार १-२ मार्च असे २ दिवस ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते.
तर मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात आज व उद्या बुधवार- गुरुवार दि.२८-२९ फेब्रुवारी असे २ दिवस ढगाळ वातावरणसहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह वीजा सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते.विदर्भ व कोकणात गारपीटीची शक्यता जाणवत नाही.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.