इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सिमलाः हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुखू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काल राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाल्याची घटना घडल्यानंतर आज नाराजी नाट्य समोर आले. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. आजच नाराज मंत्री विक्रमादित्य यांच्या राजीनामा दिला. त्यानंतर तासाभरात सुखविंदर यांनी राजीनाम्याचे हे पाऊल उचलले.
माजी मुख्यमंत्री वीरभद्र यांचा मुलगा विक्रमादित्य यांनी सुखू यांचे नाव न घेता त्यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला मतदान करून काँग्रेसच्याच उमेदवाराला पराभूत करणाऱ्या आमदार राजेंद्र राणा यांनी पक्षश्रेष्ठींकडे सुखू यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली होती. दरम्यान, हिमाचल प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांनी भाजपच्या ११ आमदारांची सभागृहातून हकालपट्टी केली. त्यात विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांचाही समावेश आहे. ठाकूर यांनी आज सकाळी राज्यपालांची भेट घेऊन विश्वासदर्शक ठरावाची मागणी केली.
त्यानंतर या वेगान घडामोढी घडल्या. यानंतर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुडा आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना पक्षश्रेष्ठींनी डॅमेज कंट्रोलसाठी पाठवले आहे.