नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कंत्राटदाराकडून लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी १५ हजार रुपयाची लाच घेतांना जळगाव येथील विद्युत निरीक्षक गणेश नागो सुरळकर (५२) हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे कंत्राटदार असून ते शासनाचे इलेक्ट्रिकल कामे करीत असतात त्यांचेकडे यासाठी लायसन्स आहे. सदरचे लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी तक्रारदार यांनी विद्युत निरीक्षकाकडे अर्ज केला होता. सदर लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांचेकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर आज रोजी पंचा समक्ष लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचे विरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – जळगाव.
तक्रारदार- पुरुष,वय-32 रा. जळगांव जि.जळगांव
आलोसे- गणेश नागो सुरळकर वय 52, वर्षे
विद्युत निरीक्षक वर्ग 1
खाते उद्योग,उर्जा व कामगार विभाग जळगांव जि.जळगांव रा.पार्वती नगर जळगाव
*लाचेची मागणी- 15,000/-
*लाच स्विकारली- 15,000/ रुपये
*हस्तगत रक्कम- 15,000/-रुपये
*लालेची मागणी – दि.27/02/20
लाचेचे कारण
यातील तक्रारदार हे कंत्राटदार असून ते शासनाचे इलेक्ट्रिकल कामे करीत असतात त्यांचे कडे यासाठी लायसन आहे. सदरचे लायसन नूतनीकरण करण्यासाठी तक्रारदार यांनी आलोसे यांचेकडे अर्ज केला होता. सदर लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे 15 हजार रुपये लाचेची मागणी करून आज रोजी पंचा समक्ष लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचे विरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*सापळा व तपास अधिकारी – श्री.सुहास देशमुख,पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव
*सापळा पथक – सफौ दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पोकॉ प्रदिप पोळ, पोकॉ. राकेश दुसाने पो.कॉ,प्रणेश ठाकुर
*कारवाई मदत पथक- अमोल वालझाडे , पोलीस निरीक्षक , एन. एन. जाधव , पोलीस निरीक्षक ,, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ
शैला धनगर ,पो.ना.किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे, पोना बाळू मराठे पोशी अमोल सूर्यवंशी,