गुरूवार, ऑगस्ट 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 27, 2024 | 9:00 pm
in संमिश्र वार्ता
0
bjp11


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी राज्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, सोलापूर जिल्ह्यातील रश्मी बागल, मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह राज्यातील विविध पक्षांतील असंख्य नेते व कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्वांचे स्वागत केले. बसवराज पाटील, रश्मी बागल यांसारख्या नेत्यांमुळे भारतीय जनता पार्टी आणखी मजबूत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा, खा.सुधाकर शृंगारे,खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड, आ. राणा जगजितसिंह पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत घडविण्याच्या संकल्पात हातभार लावण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीत अनेक जण प्रवेश करीत आहेत. विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याच्या इच्छेनेच बसवराज पाटील यांच्यासारखं जुनं, जाणतं आणि सुसंस्कृत नेतृत्व भारतीय जनता पार्टीत सहभागी झालं आहे. बसवराज पाटील, रश्मी बागल यांच्यासारखे नेते कोणत्याही अपेक्षेने पक्षात आलेले नाहीत. त्यांच्याकडून समाजहिताच्या ज्या मागण्या मांडल्या जातील त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षवाढीसाठी घेत असलेल्या परिश्रमांचे विशेष कौतुक केले.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यावेळी म्हणाले की, अनेक वर्षे काँग्रेसचे काम निष्ठेने केलेल्या बसवराज पाटील यांच्यासारख्या नेत्यालाही देशाचा विकास नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वच करू शकेल याची खात्री वाटत आहे. ”मोदी की गॅरंटी” वर विश्वास ठेवूनच समाजातील विविध घटकांतील नेते कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत.

आपण ४० वर्षे प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काँग्रेस पक्षासाठी काम केले. त्याच निष्ठेने आपण भारतीय जनता पार्टीसाठी काम करू, असे मनोगत बसवराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या संकल्प पत्रासाठी सामान्य जनतेकडून सूचना मागविण्याच्या अभियानाचा प्रारंभ प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. ठाकरे गटातून भाजपामध्ये आलेल्या राम गावडे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर लिहिलेल्या जननायक या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक विभागातील युवक-युवतींसाठी विभागीय भव्य नमो महारोजगार…नामांकित २०० पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग

Next Post

या व्यक्तींना आनंदी वार्ता मिळेल, जाणून घ्या…बुधवार, २८ फेब्रुवारीचे राशिभविष्य

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आनंदी वार्ता मिळेल, जाणून घ्या…बुधवार, २८ फेब्रुवारीचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

modi 111

भारता विरुद्ध अमेरिकेचे टेरिफ वॉर….पंतप्रधान मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्पचे नाव न घेता दिले प्रत्त्युत्तर….

ऑगस्ट 7, 2025
Untitled 8

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या समुद्राखालील ७ किमी लांबीच्या मार्गाच्या कामाला प्रारंभ…

ऑगस्ट 7, 2025
प्रातिनिधिक फोटो

सिंहस्थ कुंभ मेळा…नाशिक जिल्ह्यात ३९३ कोटी रुपये खर्चाचे १८ रेल्वे मार्गावरील उड्डाणपूलांना मंजूरी

ऑगस्ट 7, 2025
fir111

अमली पदार्थाची विक्री करणारा प्लेडर पोलीसांच्या जाळयात…५.५ ग्रॅम वजनाचे एमडी सदृष्य अंमलीपदार्थ जप्त

ऑगस्ट 7, 2025
Paytm Raksha e1754530011544

रक्षाबंधनाकरिता पेटीएमने दिले हे सहा गिफ्टिंग पर्याय…बघा, संपूर्ण माहिती

ऑगस्ट 7, 2025
मंत्री जयकुमार गोरे सरपंच यांची बैठक 1 1024x683 1

राज्यात या तारखेपासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान….गावाच्या विकासासाठी मोठी संधी

ऑगस्ट 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011