माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
काल खान्देश, मराठवाडा व विदर्भात झालेल्या वीजा गारा, वारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असुन अवकाळीचे वातावरण महाराष्ट्रात अजूनही टिकूनच आहे.
(i)सध्या मार्गस्थ होत असलेल्या प. झंजावाताबरोबरच गुरुवार २९ फेब्रुवारीला पुन्हा एक प.झंजावात मार्गस्थ होण्याची शक्यता आहे. (ii)त्याचबरोबर गुजराथमधील पोरबंदर जिल्ह्याच्या पश्चि किनारपट्टी अरबी समुद्र ते राजस्थानच्या जोधपूर पर्यन्त पसरलेल्या समुद्रसपाटी पासून जवळपास १ किमी. उंचीपर्यंतच्या हवेच्या कमी दाबाच्या निर्वात पोकळीच्या जाडीच्या आस यांच्या एकत्रित परिणामतून संपूर्ण उत्तर भारतात, शनिवार २ मार्चपर्यंत (विशेषतः १ व २ मार्चला अधिक) जोरदार पाऊस व जबरदस्त बर्फबारी होण्याची शक्यता वाढली आहे.
वरील वातावरणीय परिणामबरोबरच महाराष्ट्रातही, कर्नाटकतील चिकमंगलूर ते महाराष्ट्रातील सातारा रत्नागिरी पर्यन्त समुद्रसपाटी पासून जवळपास १ किमी. उंचीपर्यंतच्या हवेच्या कमी दाबाच्या निर्वात पोकळीच्या जाडीत पसरलेल्या आसामुळे मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातही वीजा, वाऱ्यांसाह अवकाळी पावसाची शक्यता अजुन ४ दिवस वाढली असुन ती शनिवार २ मार्च पर्यंत टिकून आहे. आज २७ ला मराठवाडा, विदर्भ व खान्देशात तुरळक ठिकाणी गारा पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.