नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गावठी पिस्तूल बाळगणा-या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून दोन पिस्तूलसह जीवंत काडतुसे असा सुमारे ५० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा अनिल चव्हाण (२२ रा.पहाडीबाबा मंदिराजवळ,सिध्दार्थ नगर एकलहरे ता.जि.नाशिक) असे संशयित पिस्तूलधारीचे नाव आहे. नांदूरनाका भागातील साऊ वजन काटा भागात एक तरूण पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती आडगाव पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.२६) रात्री पथकाने धाव घेत सापळा लावला होता.
संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात दोन पिस्तूल आणि जीवंत काडतुसे असा सुमारे ५० हजार रूपये किमतीचे अग्निशस्त्र मिळून आले. याबाबत हवालदार निलेश काटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हयाची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक सुभाष जाधव करीत आहेत.