नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धात्रकफाटा परिसरात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतिष गोपाळ कुलकर्णी (रा.वसंतप्रभा रो हाऊस.निशांत गार्डनमागे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कुलकर्णी कुटूंबिय दि.११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा लॅच लॉक तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे १ लाख २६ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.









