इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या मूळ वेतनात अडीच ते तीनपट वाढ करण्याचा निर्णय महामंडलाने घेतला आहे. त्यामुळे एसटीच्या अधिकाऱ्यांचे पगार आता दीड-दोन लाखांच्या पुढे जाणार आहेत. गावखेड्यापर्यंत एसटी पोहोचवणारे चालक-वाहक तुटपुंज्या वेतनावर राबत असतांना एसटीची अधिका-यांची पगारवाढ करण्यात आल्यामुळे एसटी कर्मचा-यांत प्रचंड असंतोष आहे. या अधिका-यांच्या मूळ वेतनात अडीच से तीन पट वाढ केल्याने महामंडळावर महिन्याला साडेचार कोटींचा भार पडणार असल्याचे कर्मचारी संघटनेने सांगितले.
२००८ च्या मूळ वेतनाचा विचार करता अधिकाऱ्यांच्या मूळ वेतनात अडीच ते तीनपट वाढ झाली असून ती २०१६ पासून लागू होणार आहे.
याचा लाभ आगार व्यवस्थापक ते महाव्यवस्थापक पदापर्यंत कार्यरत असलेल्या ३७५ अधिकाऱ्यांना मिळणार आहे. दरम्यान, एसटीची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना २०१६ पासून कोणतीही वेतनवाढ करण्यात आली नव्हती. दुसरीकडे एसटीमध्ये जवळपास ९० हजार कर्मचारी कार्यरत असून त्यांना वेतनवाढ, महागाई भत्ता मिळावा म्हणून रोज उपोषण, आंदोलन करावे लागते. मात्र अधिकाऱ्यांना घसघशीत पगारवाढ करतांना महामंडळाने मात्र कर्मचा-यांकडे दुर्लक्ष केले आहे.
अशी झाली पगावर वाढ
वर्ग – २ अधिकारी (कनिष्ठ) – सध्याचे मूळ वेतन १२,७९०- ३१,५०३ एवढे असून ते आता ३४,६३० – ८१,६०६ होणार आहे. वर्ग – २ अधिकारी (वरिष्ठ) सध्याचे मूळ वेतन १४,४८०- ३६,१४१ असून ते आता ३९,७३०- ९३,६२८ होईल. वर्ग – १ अधिकारी- सध्या मूळ वेतन १७,४०० – ४२, २५६ असून ते ४६, ४५० – १,०९, ४८५ होईल. वेतन २०,८८० – ४३, ७३७ असून ते आता ४५,७५० – १,३१,३८१ होईल.
उपमहाव्यवस्थापक- मूळ वेतन २४,८९० – ४४,९६६ असून ते आता ६६, ४५६ – १,५६,६१३ होईल.
महाव्यवस्थापक (निवड श्रेणी) सध्या मूळ वेतन २८,४५०- ५१,५५९ असून ते आता ७६,१६८-१,७९,५७६ एवढे होणार आहे.
महाव्यवस्थापक- मूळ वेतन २६, २८० – ४७, ४७८ असून ते आता ७०,१६८- १,६५,३५३ होईल.