बुधवार, सप्टेंबर 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पुणे जिल्हा बँकेने सुरू केली ही सुविधा… अजित पवारांच्या हस्ते उदघाटन… ग्राहकांना असा होणार फायदा….

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 13, 2023 | 1:46 pm
in राज्य
0
unnamed 2023 10 13T134359.656

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची युपीआय सेवा आणि पगारदारांकरिता अपघात विमा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. बँकेने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांचा विश्वास संपादन करावा. योग्य नियोजन तसेच उत्तम आणि पारदर्शक कारभाराद्वारे ग्राहकांचे समाधान होईल असे काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला आमदार अशोक पवार, संजय जगताप, बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, रमेश थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, युपीआयसारख्या सुविधेचा वापर करून बँकेने आपण काळासोबत असल्याचे दाखवून दिले आहे. या सेवेमुळे ग्राहकांना एका क्लिकवर विविध सुविधा मिळू शकतील आणि बँकेत होणारी गर्दी कमी होईल. बँकींग क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. अशावेळी व्यापारी आणि स्थानिक पतसंस्थांशी स्पर्धा करताना अनुकूल बदल घडवून आणावे लागतील. त्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात सातत्य ठेवावे.

बँकेने ग्राहक हित समोर ठेवून वाटचाल करावी. मोबाईल बँकीगमुळे या क्षेत्रात बदल होत आहेत. त्यामुळे नव्या कर्मचाऱ्यांची भरती करताना नवे तंत्रज्ञान जाणणाऱ्या उमेदवारांची निवड करावी, स्थानिक उमेदवारांना यात प्राधान्य देण्यात यावे. बँकेच्या शाखा वाढवून व्यवसाय वाढविण्यावर भर द्यावा. बँकेच्या विकासविषयक बाबी मार्गी लावण्यासाठी कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही श्री.पवार यांनी दिली.

पगारदारांसाठी सुरू करण्यात आलेल्या अपघात विमा योजनेमुळे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक संरक्षण मिळेल असे सांगून हे विमा संरक्षण 30 लाखाहून 50 लाख रुपयांपर्यंत वाढविण्याबाबत संचालक मंडळाने विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली. बँक कर्मचाऱ्यांनी कुटुंब आणि समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि ग्राहकांचे हीत जपण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केले.

बारामतीच्या नागरिकांमुळे बँकेचा संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीत हातभार लावता आला, बँकेमुळे सर्वांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यामुळे बँकेशी निगडीत घटकांचा कायम ऋणी राहील, अशा शब्दात त्यांनी बँकेविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.

प्रारंभी श्री.दुर्गाडे यांनी बँकेच्या प्रगतीविषयी माहिती दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नागरी सहकारी बँकांमध्ये पहिल्या पाचमध्ये पोहोचली आहे. बँकेच्या यूपीआय सेवेमुळे खातेदारांना त्यांच्या आर्थिक गरजेनुसार तात्काळ आणि सुरक्षितपणे व्यवहार करता येईल. अपघात विमा योजनेचा बँकेच्या सुमारे 26 हजार पगारदार खातेदारांना लाभ होणार असून त्यापोटी बँकेला 1 कोटी 55 लाख रुपये खर्च येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

युवक वाढदिवसाच्या पार्टीला गेला… अन् होत्याचं नव्हतं झालं….लातुरातील घटनेने सर्वत्र हळहळ

Next Post

एसटीचे अधिका-यांची पगारवाढ, कर्मचा-यांकडे मात्र दुर्लक्ष

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

FB IMG 1758718581267
स्थानिक बातम्या

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते २७ सप्टेंबरला नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

सप्टेंबर 24, 2025
Denver Mahesh Babu Launching Mobile Banner 03 1 e1758715475805
संमिश्र वार्ता

सुपरस्टार महेश बाबूने केली एक ब्रॅंड फिल्म लॉन्च…या पर्फ्यूम्सचा करणार प्रचार

सप्टेंबर 24, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी…१०,९१,१४६ रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार इतका बोनस

सप्टेंबर 24, 2025
Campus 1
स्थानिक बातम्या

दशकपूर्ती….राज्यातील पहिल्या तीन हॉस्पिटलमध्ये एसएमबीटी…६०० तज्ञ डॉक्टरांची टीम

सप्टेंबर 24, 2025
crime1
क्राईम डायरी

पोलिसांना जप्त केलेल्या १६ दुचाकी वाहनांचे मालकच सापडेना….मग, या पत्त्यावर पाठवले समजपत्र

सप्टेंबर 24, 2025
Untitled 33
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी

सप्टेंबर 24, 2025
jail1
क्राईम डायरी

सव्वा लाखाचे मॅफेड्रॉन जप्त…दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सप्टेंबर 24, 2025
Untitled 32
संमिश्र वार्ता

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची आमदार रोहित पवार यांनी केली पाहणी….केली ही मागणी

सप्टेंबर 24, 2025
Next Post
st bus e1697185684773

एसटीचे अधिका-यांची पगारवाढ, कर्मचा-यांकडे मात्र दुर्लक्ष

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011