मुंबई ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एनएफडीसी स्क्रीनरायटर्स लॅबच्या १६ व्या आवृत्तीसाठी जादुई वास्तवता, कल्पनाविश्व, भय/थरार, महिला सक्षमीकरण, सीमेपलीकडील राजकारण, एलजीबीटीक्यू+ मुद्दे आणि मानसिक आजार या विषयांवर आधारित पटकथालेखनाच्या ८ प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. देशभरातील खऱ्या प्रतिभेचा विकास करण्यासाठी, जोपासना करण्यासाठी आणि गुणवंतांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो. निवड झालेले हे ८ पटकथालेखक जाहिरातपट, लघुपट, माहितीपट आणि फीचर फिल्म्स यांचे देखील निर्माते आहेत आणि त्यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी, ऊर्दू, मलयाळम, बंगाली, ओडिया आणि तिबेटी या भाषांसह विविध भाषांमध्ये लिहिलेल्या पटकथांची निवड झाली आहे. यापैकी दोन लेखक सर्वोत्तम मराठी चित्रपट आणि सर्वोत्तम छायालेखनकला यासाठीचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत.
एनएफडीसीमध्ये असलेल्या आम्हाला अगदी ठामपणे असे वाटते की एखादा चित्रपट यशस्वी ठरण्यासाठी लक्षवेधी कथानक, खिळवून ठेवणारी पात्रे आणि अर्थपूर्ण संवाद या सर्वांचा पाया हा अतिशय उत्तम पद्धतीने लिहिलेल्या पटकथेद्वारे घातला जातो, असे एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रिथुल कुमार यांनी सांगितले. चित्रपट उद्योगातील कल आणि पद्धती लक्षात घेऊन आम्ही लेखकांना वैशिष्ट्यपूर्ण कथांचा चांगल्या प्रकारे विकास कसा करायचा हे तर शिकवतोच पण त्याचबरोबर त्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय निर्माते आणि गुंतवणूकदार यांच्यासमोर यशस्वीरित्या कसे सादर करायचे हे देखील शिकवतो, अशी माहिती त्यांनी दिली.
तीन भागांमध्ये होणारी ही अतिशय सखोल प्रशिक्षण असलेली कार्यशाळा म्हणजे वार्षिक कार्यक्रम असून उदयोन्मुख आणि प्रस्थापित पटकथालेखकांना भारतभरातील आणि जगातील नामवंत पटकथालेखकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पटकथा संपूर्णपणे विकसित करण्याची संधी उपलब्ध करून देते.
यावर्षीच्या मार्गदर्शकांमध्ये एनएफडीसी पटकथा लेखकांचे संस्थापक लॅब मार्टेन रबार्ट्स (न्यूझीलंड), क्लेअर डॉबिन (ऑस्ट्रेलिया), बिकास मिश्रा (मुंबई) आणि केतकी पंडीत ( पुणे) यांचा समावेश आहे. मूल्यांकनकर्त्यांमध्ये मेलानी डिक्स, सिंथिया केन, ग्यान कोरिया, आर्फी लांबा, सिद्धार्थ जातला, उदीता झुनझुनवाला आणि कचन कालरा यांच्यासारख्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटकार, निर्माते आणि पत्रकारांचा समावेश आहे.
२०२३ स्क्रीनरायटर्स लॅब मध्ये निवड झालेले सहभागी
आणि प्रकल्पांची नावे पुढीलप्रमाणे आहेत
अविनाश अरुण- “बूमरँग”( किल्ला साठी सर्वोत्तम मराठी चित्रपटाचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते)
संजू कडू – “कोसला (द ककून)”
रोहन के. मेहता – “ऍब्सेंट”
नेहा नेगी – “छावणी (कँट)”
वत्सला पटेल – “दांत (चावा)”
बिस्व रंजन प्रधान – “प्रमाण पत्र”
दिवा शाह – “छब (निर्वासित)”
सविता सिंग – “बॅलेड ऑफ द सर्कस” (सर्वोत्तम छायालेखनासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेता)
NFDC ScreenWriters’ Lab 2023 Unveils EIGHT Dynamic Writers & Scripts from Pan-India