रायगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धुतुम – दिघोडे गावाजवळील खाडीत लहान होडीतुन मासेमारीसाठी गेलेल्या आदिवासिंच्या अंगावर पायवाटेवरील पूल कोसळून दोन आदिवासीचा जागीच मृत्यू झाला असून,आणखी दोघे गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजताचे सुमारास घडली आहे. या आदिवासीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या वृत्तानुसार धुतुम – दिघोडे गावाजवळील खाडीत वीट भट्टीवर काम करीत असलेले आदिवासी लहान होडीतुन मासेमारीसाठी गेले असता खाडीवरील पायवाट सुरू असलेला मागील कित्येक वर्षी बांधण्यात काँक्रिट पूल अचानकपणे आदिवासीच्या अंगावर कोसळून अविनाश सुरेश मिरकुटे रा- सापोली, ता – पेण,राजेश लक्ष्मण वाघमारे रा – वरसई- कटोरी ,ता – पेण यांचा जागीच मृत्यू झाला असून,गुरु सदानंद कातकरी व सुरज श्याम कातकरी रा.वेश्वी आदिवासीवाडी,ता – उरण हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
या पूल अपघातातील जखमिंना धुतुम ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामस्थ आणि पोलिसांचे मदतीने रुग्णवाहिकेची तात्काळ व्यवस्था करून उपचारासाठी कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,मयत इसमांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी कोसळलेल्या पुलाचे भाग बाजूला काढण्यासाठी पोकलन यंत्राच्या काढण्यात आले. दुर्घटना स्थळी उरण पोलिस ठाण्याचे गुन्हे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कांबळे त्यांच्या पोलिस पथकासह दाखल झाले असून, सदरचा पूल कोसळल्याने हा अपघात कशामुळे झाला आणखी सोबत किती आदिवासी किंवा अन्य कोण होते.याचा तपास पोलीस अधिकारी करीत आहेत.