इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आज राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर विधानसभा परिसरात काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवादाची एक व्हिडिओ क्लीप सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. त्यात मुख्यमंत्री लिमीटच्या बाहेर गेला की कार्यक्रम करतो मी असे सांगत असल्याचे दिसत आहे.
या संवादावरुन काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर की क्लीप टाकत म्हटले आहे की, या संवादात कार्यक्रम म्हणजे काय समजायचं साहेब? मुख्यमंत्री साहेब!, ही धमकी आहे का? उद्या जर जरांगे पाटलांचा जीव गेला तर मुख्यमंत्री जबाबदार असणार का?