नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा परिषदेच्या इमारतीवर चढत हातात ज्वलनशील पदार्थ घेऊन एका व्यक्तीने नागरिकांचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो मी आत्महत्या करेल असे ते वारंवार म्हणत होता. या प्रकरणाची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी याबाबत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.
या घटनेबाबत मित्तल यांनी सांगितले की, नाशिक जिल्हा परिषदेच्या इमारतीवर चढत हातात ज्वलनशील पदार्थ घेऊन एका व्यक्तीने नागरिकांचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला व मी आत्महत्या करेल असे ते वारंवार म्हणत असे कळाले. सदर व्यक्ती दोन महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाशी निगडीत होती. या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही सुद्धा झालेली असून त्यांचा जिल्हा परिषदेशी संबंधित एकही मुद्दा प्रलंबित नाही. तरीदेखील सदर व्यक्ती हे दररोज जिल्हा परिषदेत येऊन विनाकारण आरडाओरड करतात. या संदर्भात पोलिस प्रशासनाला यापूर्वी पत्र देखील देण्यात आले आहे. आज झालेला प्रकार हा गंभीर असून यासंदर्भात पोलिस कारवाई करत गुन्हा दाखल करण्याबाबतचे निर्देश मी सामान्य प्रशासन विभागास दिले आहेत.