इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क
नाशिक- सुसंस्कृत आणि तीर्थक्षेत्र म्हणून नाशिक देशात ओळखले जाते. आज ते पंजाब आणि गुजरात प्रमाणे “उडते नाशिक” झाले आहे काय ? गुन्हेगारी आणि नशेच्या विळख्यात सापडलेल्या नाशिकला त्या दुष्टचक्रातून सोडवावे लागेल. उडते नाशिकला जबाबदार कोण? नाशिक मधील गुन्हेगार आणि नशेच्या माफियांना कोण पाठीशी घालत आहे ? गृहमंत्री चूप का आहेत ? असे प्रश्न करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी नाशिक येथे हॅाटेल एक्स्प्रेस इन येथे पत्रकार परिषद घेतली.
यावेळी त्यांनी नाशिक ड्रग्ज माफिया आणि गुन्हेगारांचा अड्डा बनला असून तरुण पिढी उदध्वस्त होत आहे. त्यामुळे शिवसेना रस्त्यावर उतरेल, वेळ आली तर मंत्र्यांच्या गाड्या अडवू, नाशिक बंद करू अशा इशारा संजय राऊत यांनी दिला. यावेळी त्यांनी या विषयावर २० ऑक्टोबरला विराट मोर्चाचे आयोजन करण्यात येईल अशी घोषणाही केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी नाशिकरोडजवळ कोट्यवधीचा कारखाना उध्वस्त करण्यात आला आहे. नाशिकमधील शाळा, कॉलेज अनेक शैक्षणिक संस्थांना ड्रग्जचा विळखा बसला आहे. यामुळे पालक अस्वस्थ आहेत. त्यामुळे हा मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी या मोर्चा बाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली असून २० तारखेला शिवसेनेचा विराट मोर्चा निघेल. या मोर्चात शहरातील जिल्ह्यातील नागरिकांनी, पालकांनी या मोर्चात सहभागी होऊन निषेध नोंदवावा असे आवाहन राऊत यांनी केले.
गेल्या ७ ते ८ महिन्यापासून ज्या विषयात गाजताय ते नाशिकला शोभणारे नाही. ड्रग्ज आणि नाशिक चर्चेत आले. जी माहिती समोर आली ती भयंकर आहे. नाशिक ड्रग्ज माफियांचा अड्डा बनलाय. पंजाब आणि गुजरात नंतर उडता नाशिक होतंय का काय ? गेल्या २ वर्षात ड्रग्ज चा व्यवहार सुरू आहे. बंदरांवर ड्रग्जचा साठा सापडला, त्यातले ड्रग्ज नाशिकला यायचे अन्य मार्गाने यायचे. नाशिक गुंडांचा अड्डा होतंय, त्यांना राजकीय आश्रय आहे, मला जी माहिती मिळाली, ती धक्कादायक आहे. कॉलेज मधील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी यांना ड्रग्ज मिळत आहे सहा महिन्यापासून पालक अस्वस्थ आहे. १०० च्या वर मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. नशेच्या आहारी गेलेल्या लोकांनी आत्महत्या केल्या तर काहींचे अतिसेवणामुळे मृत्यू झाले आहे.
शिंदे गावात झालेल्या ड्रग्ज चा कारखान्याला राजकिय आश्रय होते. पोलीसांचाही यांच्यात समावेश आहे. नाशिकचे पालकमंत्री आणि ज्यांना पालकमंत्री व्हायचे आहे ते याला जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी ते म्हणाले, शासकीय यंत्रणा, पालकमंत्री, मंत्री, आमदार आणि पोलीस सहभागी आहे. दादा भुसे याना राजीनामा द्यावा लागेल आणि राजकारण ही सोडावे लागेल. कुणाकडे हप्ते जात होते याची यादी आमच्याकडे आहे. ती आम्ही जाहीर करु असेही त्यांनी सांगितले.